Raj Kundra Case : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी अटक केली होती. राज सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांनी मुंबई पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर असल्याचे आव्हान दिले. परंतु राज यांना उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली आहे. Breaking News Raj kundra case bombay high court dismissed shilpa shetty husband plea challenging his remand
विशेष प्रतिनिधी
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी अटक केली होती. राज सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांनी मुंबई पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर असल्याचे आव्हान दिले. परंतु राज यांना उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने 2 ऑगस्ट रोजी मुंबई पोलिसांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आदेश राखून ठेवला होता. आज न्यायमूर्ती ए एस गडकरी यांनी यावर निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती ए.एस. गडकरी यांनी निरीक्षण नोंदवले आहे की, महानगर दंडाधिकाऱ्यांची कस्टोडियल रिमांड कायद्यानुसार आहे आणि कोणत्याही हस्तक्षेपाची आवश्यकता नाही.
29 जुलै रोजी राज कुंद्रा आणि रायन थोरपे यांच्या जामिनावर न्यायालयाने दोघांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकला. राज कुंद्राच्या वकिलाने म्हटले होते की, त्याला चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली होती, तर पोलिसांनी सांगितले की राजने सीआरपीसीच्या कलम 41 (ए) वर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
मीडिया कव्हरेजच्या विरोधात शिल्पा शेट्टी उच्च न्यायालयात गेली
शिल्पा शेट्टीने राज कुंद्रा प्रकरणाबाबत मीडिया कव्हरेज संदर्भात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ज्यावर उच्च न्यायालयाने स्वतः शिल्पाला खडसावले होते. हायकोर्टाने शिल्पा शेट्टीच्या वकिलाला सांगितले की, तुमच्या क्लायंटच्या पतीविरुद्ध गंभीर केस आहे. मीडिया या प्रकरणाचे कव्हरेज करत आहे. भारतातील माध्यमांना बातम्या प्रकाशित करण्याचे आणि दाखवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. माध्यमांच्या स्वातंत्र्यावर परिणाम करण्याचे कोणतेही काम उच्च न्यायालय करणार नाही. उच्च न्यायालय या प्रकरणात हस्तक्षेप करणार नाही.
Breaking News Raj kundra case bombay high court dismissed shilpa shetty husband plea challenging his remand
महत्त्वाच्या बातम्या
- ऐतिहासिक बदल : श्रीनगरच्या लाल चौकात तिरंग्याची रोषणाई, कलम 370 पासून मुक्ती मिळाल्यानंतर काश्मिरातील बदलांचे दिलासादायक चित्र
- केरळ हायकोर्ट : पत्नीच्या शरीराला आपली संपत्ती समजणे वैवाहिक बलात्कारच, घटस्फोट घेण्याचा ठोस आधार
- Covid 19 Vaccination : देशात कोरोना लसीकरणाचा आकडा 50 कोटींच्या पुढे, अवघ्या 20 दिवसांत 10 कोटी डोस दिले, आतापर्यंतची आकडेवारी वाचा सविस्तर…
- मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी हॉकीपटू सलीमा आणि निक्की यांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची घोषणा केली
- अफगाणिस्तानात ३०० दहशतवादी ठार, सैनिकांची धडक कारवाई