विशेष प्रतिनिधी
मुंबई : कल्याण येथील मलंगगडावर फिरायला गेलेल्या दोन मुले आणि दोन मुलींना रविवारी बेदम मारहाण कऱण्यात आली आहे. त्यांनी घातलेल्या तोकड्या कपड्यावरून ही मारहाण झाली. या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली. Boys and girls at Malanggad Beating on clothes
मालंगगडावर फिरायला गेलेल्या मुला मुलींना तुम्ही तोकडे कपडे घातले असल्याचे सांगून 6 ते 8 जणांच्या टोळक्याने मारहाण केली. पण, कुणी कोणते कपडे घालायचे हे ठरविण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला. तसेच नेवाळी ठाण्यात तक्रार दाखल करून घेतली नाही. तसेच त्यांच्यावर उपचारही पोलिसांनी केले नाहीत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानी या गंभीर प्रकारची नोंद घ्यावी. पोलीस जनतेचे रक्षण करू शकत नसतील तर जनतेने स्व संरक्षणासाठी आता हत्यार बाळगण्याची गरज निर्माण झाल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. अशा प्रकारची घटना औरंगाबाद येथेही घडल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतल्याचे वृत्त आहे.
- मलंगगडावर फिरायला गेलेल्या मुला मुलींना मारहाण
- समाजकंटकांवर कडक कारवाई करा : चित्रा वाघ
- अयोग्य कपडे घातले असल्याचे सांगून मारहाण
- नेवाळे पोलीस ठाण्यात तक्रारीची दाखल नाही
- जखमींवर उपचार करण्याची तसदी घेतली नाही
- वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी
- समाजकंटक मोकाट, जनता बेहाल
- स्वसंरक्षणासाठी हत्यारे बाळगण्याची आता गरज
Boys and girls at Malanggad Beating on clothes
महत्त्वाच्या बातम्या
- मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांचे धाडस, पुरात अडकलेल्यांना वाचविण्यासाठी स्वत : मोटरबोट घेऊन गेले, हेलिकॉप्टरच्या सहाय्याने काढले ग्रामस्थांना बाहेर
- ऑलिम्पिक पदकविजेत्या लोव्हलिनाला आसाम सरकार देणार अनोखी भेट, घराकडे जाण्यासाठी मिळणार पक्का रस्ता
- प्रियंका गांधी- वड्राच उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा, कॉँग्रेस स्वबळावरच सर्व जागा लढविणार
- राज्यातील वीज कंपन्यांचा तोटा ९० हजार कोटींपर्यंत पोहोचले, निती आयोगाचा अहवाल