वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात आज 4 ऑगस्ट 2022 रोजी एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे गटातील शिवसेना यांच्यातील परस्पर संघर्षाच्या 5 महत्त्वाच्या याचिकांवर सुनावणी सुरु आहे. गुरुवारी या खटल्याची सुनावणी सुरु झाल्यानंतर, पहिल्यांदाच एकनाथ शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांनी युक्तिवाद केला. एकनाथ शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईपासून त्यांनी न्यायालयासमोर काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. Both sides in Supreme Court on Shinde – Thackeray power struggle
सुनावणीतले काही महत्त्वाचे मुद्दे
- एकनाथ शिंदे सरकारच्या विश्वास दर्शक ठरावाच्या वेळी पक्षाच्या विरोधात सदस्यांनी मतदान केले असते तर 10 व्या परिशिष्टानुसार, विधानसभा अध्यक्षांना अपात्रेतेची कारवाई करता आली असती, पण यात तसे झालेले नाही.
- राजकीय पक्षांकडे असे दुर्लक्ष करता येणार नाही, न्यायाधीशांचे मत, तर शिंदे गटातील आमदारांनी पक्ष सोडलेला नाही, हरिश साळवेंचा युक्तीवाद
- पक्षविरोधी काम करत आहेत या स्वत:च्या धारणेवरुन विधानसभा उपाध्यक्ष सदस्यांना अपात्र ठरवू शकतात का? हरिश साळवेंचा सवाल
- आमच्यासाठी बंडखोर आमदार अपात्र, अपात्र ठरलेले लोक आयोगाकडे जाऊ शकत नाहीत, ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद, दोन गट मूळ पक्ष असल्याचा दावा करु शकत नाहीत का? न्यायालयाचा सवाल
- शिंदे गटातील आमदारांकडून राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यात गल्लत केली जाते आहे, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
- सर्वांच्या लिखित युक्तिवादाचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेऊ, सुप्रीम कोर्टाचा आजचा निर्णय
- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आता सोमवार, 8 ऑगस्ट रोजी सुनावणी. निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने पाठविलेल्या नोटिशीबाबत वेळ वाढवून द्यावा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
Both sides in Supreme Court on Shinde – Thackeray power struggle
महत्वाच्या बातम्या
- टोल प्लाझा बदलण्याचा सरकारचा विचार, रांगा घटवण्यासाठी सॅटेलाइट आधारित टोल आणणार, गडकरींची माहिती
- ड्रॅगनची अमेरिकेला जाहीर धमकी : परिणाम भोगण्यास तयार राहा, जगात दोन गट पडले
- क्रांतिदिनापासून छत्रपती संभाजीराजेंची परिवर्तन क्रांती, तुळजापुरातून होणार प्रारंभ
- TET गैरव्यवहार प्रकरण : 293 शिक्षक बडतर्फी, 7880 जण कायम अपात्र