• Download App
    राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी 10 ते 12 रेल्वे गाड्यांचे बुकिंग; अयोध्येतही स्वागताचे फलक!!|Booking of 10 to 12 trains for Raj Thackeray's visit to Ayodhya; Welcome board in Ayodhya too

    राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी 10 ते 12 रेल्वे गाड्यांचे बुकिंग; अयोध्येतही स्वागताचे फलक!!

    प्रतिनिधी

    मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या 3 जूनच्या अयोध्या दौऱ्यासाठी महाराष्ट्रातून वेगवेगळ्या शहरातून 10 ते 12 रेल्वे गाड्यांचे बुकिंग करण्यात येणार आहे. यासाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना मनसे नेत्यांनी पत्र देखील पाठवले आहे.Booking of 10 to 12 trains for Raj Thackeray’s visit to Ayodhya; Welcome board in Ayodhya too

    त्याचबरोबर अयोध्या दौऱ्याचे नियोजन वेगवेगळ्या शहरांमध्ये सुरू असून आजच्या संदर्भात बैठक राज ठाकरे यांनी शिवतीर्थ या आपल्या निवासस्थानी घेतली. त्यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आदी शहरांमधून मनसे कार्यकर्त्यांना अयोध्या घेऊन जाण्यासाठी रेल्वे गाड्यांचे विशेष बुकिंग करण्यात येत आहे. या संदर्भात चे पत्र रावसाहेब दानवे यांना पाठवण्यात आले आहे.



    त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना राज ठाकरे यांच्या सुरक्षेबाबत पत्र पाठवण्यात आले आहे. राज ठाकरे यांच्या “चला अयोध्येला” या आवाहनाची पोस्टर्स वेगवेगळ्या शहरात लागली असून अयोध्येत देखील महेश कदम राज ठाकरे यांच्या स्वागताचे फलक लावले आहेत.

    राज ठाकरे यांची महाराष्ट्र दिन 1 मे रोजी संभाजीनगर मध्ये सभा होणार आहे, तर 3 मे रोजी अक्षय तृतीये दिवशी राज्यभरात महाआरती आणि हनुमान चालीसाचे सार्वजनिक वाचन असे कार्यक्रम मनसेने आयोजित केले आहेत. या दोन्ही कार्यक्रमांच्या निमित्ताने मनसे राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचा भरपूर प्रचार करून घेणार आहे.

    Booking of 10 to 12 trains for Raj Thackeray’s visit to Ayodhya; Welcome board in Ayodhya too

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस