Bombay HC Cancels Maharashtra CET For Class 11 Admissions : मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 रोजी अकरावीच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र सरकारची सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) रद्द केली आहे. उच्च न्यायालयाचा हा निर्णय दहावी उत्तीर्ण झालेल्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा देणारा आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 रोजी अकरावीच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र सरकारची सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) रद्द केली आहे. उच्च न्यायालयाचा हा निर्णय दहावी उत्तीर्ण झालेल्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा देणारा आहे. Bombay HC Cancels Maharashtra CET For Class 11 Admissions
सीआयसीएसई बोर्डाशी संलग्न असलेल्या मुंबईच्या आयईएस ओरियन शाळेच्या विद्यार्थिनी अनन्या पत्की आणि चार आयजीसीएसई विद्यार्थ्यांनी केलेल्या हस्तक्षेप याचिकेवर हा आदेश देण्यात आला. दरम्यान, कोरोना महामारीमुळे या वर्षी 10 वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. या वेळी विद्यार्थ्यांचे निकाल विशेष मूल्यमापन धोरणाद्वारे तयार करण्यात आले. यामुळे अनेक संस्था थेट 10 वीच्या गुणांच्या आधारे प्रवेश देत नाहीयेत, त्यासाठी प्रवेश परीक्षांचे आयोजन केले जात आहे.
कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वी 10 वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (सीईटी) 21 ऑगस्ट 2021 रोजी राज्यभर घेण्यात येणार होती. न्यायमूर्ती आर. डी. धानुका आणि न्यायमूर्ती आर. आय. छागला यांच्या खंडपीठाने राज्य सरकारने 28 मे रोजी जारी केलेली अधिसूचना बाजूला ठेवली, ज्यात उल्लेख होता की, सर्व बोर्डांमध्ये 10 वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सीईटी आयोजित केली जाईल, ज्याच्या आधारे ते इयत्ता 11 वी प्रवेशासाठी पसंतीचे कनिष्ठ महाविद्यालय निवडू शकतील.
उच्च न्यायालयाने म्हटले की, राज्य सरकारला अशी अधिसूचना जारी करण्याचा अधिकार नाही आणि हे न्यायालय अशा घोर अन्यायाच्या बाबतीत हस्तक्षेप करू शकते. न्यायालयाने राज्य सरकारला निर्देश दिले की, इयत्ता 11 वीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे 10 वीचे गुण आणि अंतर्गत मूल्यांकन लक्षात घेऊन प्रवेश देणे सुरू करावे आणि सहा आठवड्यांच्या कालावधीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.
Bombay HC Cancels Maharashtra CET For Class 11 Admissions
महत्त्वाच्या बातम्या
- पावसाळी अधिवेशन : राज्यसभेत भाजप खासदारांच्या अनुपस्थितीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केली नाराजी, यादी मागितली
- NRC देशभरात लागू करण्याबाबत अद्याप निर्णय नाही, गृह मंत्रालयाची संसदेत माहिती, जातनिहाय जनगणना, ओबीसी आरक्षणावरही साधकबाधक चर्चा
- अफगाणमध्ये परिस्थिती गंभीर : कंधारनंतर आता भारत आपले राजनयिक आणि कर्मचाऱ्यांना मजार-ए-शरीफमधून माघारी बोलवणार
- शुभेंदू अधिकारींचा गंभीर आरोप, म्हणाले- ‘ममता सरकारकडून बलात्काराचा राजकीय शस्त्रासारखा वापर’
- खुशखबर : आता स्वयंसहायता गटांना हमीशिवाय मिळेल 20 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज, रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय