तुम्ही ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले असेल तर तुम्हाला बँकेत करिअर करण्याची सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्राने नुकतेच अॅग्रिकल्चर फील्ड ऑफिसर (AFO), सुरक्षा अधिकारी (SO) आणि विधी अधिकारी यासह 190 पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. अधिसूचनेनुसार, काही पदांसाठी संबंधित क्षेत्रातील अनुभवाचीही मागणी करण्यात आली आहे. बँकेद्वारे घेतलेल्या परीक्षेच्या आधारे या पदांवर उमेदवारांची निवड केली जाईल. BOM Recruitment 2021 Opportunity to get job in bank of maharashtra Know How To apply
विशेष प्रतिनिधी
मुंबई : तुम्ही ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले असेल तर तुम्हाला बँकेत करिअर करण्याची सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्राने नुकतेच अॅग्रिकल्चर फील्ड ऑफिसर (AFO), सुरक्षा अधिकारी (SO) आणि विधी अधिकारी यासह 190 पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. अधिसूचनेनुसार, काही पदांसाठी संबंधित क्षेत्रातील अनुभवाचीही मागणी करण्यात आली आहे. बँकेद्वारे घेतलेल्या परीक्षेच्या आधारे या पदांवर उमेदवारांची निवड केली जाईल.
या पदांची भरती
बँक ऑफ महाराष्ट्रच्या नोटीसनुसार,
अॅग्रिकल्चर फील्ड ऑफिसर 100,
सिक्युरिटी ऑफिसर 10,
लॉ ऑफिसर 10,
एचआर ऑफिसर 10,
आयटी सपोर्ट अॅडिमिनिस्ट्रेटर 30,
डीबीएसाठी 12,
विंडो अॅडिमिनिस्ट्रेटर 12,
प्रोडक्ट सपोर्ट इंजिनिअर 3,
नेटवर्क आणि सिक्युरिटी ऑफिसर 10 आणि
ई -मेल अॅडमिनिस्ट्रेटरच्या 2 जागा रिक्त आहेत.
महत्त्वाच्या तारखा
स्पेशालिस्ट ऑफिसरच्या या पदांसाठी अर्ज 1 सप्टेंबर 2021 पासून सुरू झाले. पात्र उमेदवार 19 सप्टेंबर 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. सर्व उमेदवारांनी 19 सप्टेंबरपर्यंत अर्जाची फी जमा करून फॉर्म भरायचा आहे. सध्या बँकेने भरती परीक्षेची तारीख जाहीर केलेली नाही.
पात्रता
कृषी क्षेत्र अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे 60% गुणांसह पदवी असणे आवश्यक आहे. लॉ ऑफिसरसाठी LLB पदवी, HR अधिकाऱ्यासाठी एमबीए किंवा त्याच्या समकक्ष पदवी गरजेची आहे. ज्या तरुणांनी काही पदांवर इंजिनिअरिंग केले आहे तेदेखील अर्ज करू शकतात. याबद्दल अधिक माहितीसाठी आपण भरती अधिसूचना पाहू शकता.
वयोमर्यादा
वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. कृषी क्षेत्र अधिकारी आणि आयटी सपोर्ट अॅडमिनिस्ट्रेटरसाठी वयोमर्यादा 20 ते 30 वर्षे आहे. 25 ते 35 वयोगटातील उमेदवार इतर सर्व पदांसाठी अर्ज करू शकतात.
असा करा अर्ज
सर्वप्रथम तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत वेबसाइट www.bankofmaharashtra.in वर जावे लागेल. यानंतर वेबसाईटचे होम पेज तुमच्या समोर उघडेल. येथे तुम्हाला सर्वात वर मेनूचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर करिअरवर जा. आता तुम्हाला या भरतीची अधिकृत जाहिरात मिळेल, ती डाउनलोड करा. यामध्ये तुम्हाला अर्ज भरण्याविषयी संपूर्ण माहिती मिळेल आणि अर्जाची लिंकदेखील मिळेल.
BOM Recruitment 2021 Opportunity to get job in bank of maharashtra Know How To apply
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : DCGIची कोरोनावरील प्रभावी औषध TOCIRA ला मंजुरी, व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांसाठीही वापरता येईल
- पवार – वळसे यांच्या कार्यक्रमांना गर्दी; मुख्यमंत्र्यांची तंबी; आता राष्ट्रवादीला गर्दी टाळण्याची उपरती
- थलायवीची वाट पाहत असलेल्या कंगना राणावतच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, नेटफ्लिक्सवर ‘या’ दिवशी हिंदीमध्ये प्रदर्शित होणार
- भारतातील दिल्ली, मुंबई ही शहरे सुरक्षित; जगातील सुरक्षित शहरांच्या यादीत समावेश
- देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल , “आधी सोबतच्यांना शिकवा, मग आम्हाला सांगा”