• Download App
    Bollywood Drug Case : अरमान कोहलीच्या मोबाइलमधून धक्कादायक खुलासा, पेरू-कोलंबियाहून ड्रग्जचा पुरवठा; मोठ्या ड्रग कार्टेलशी संबंध । Bollywood Drug Case Armaan Kohlis mobile chat revealed drugs were came from Peru Colombia big drug cartels

    Bollywood Drug Case : अरमान कोहलीच्या मोबाइलमधून धक्कादायक खुलासा, पेरू-कोलंबियाहून ड्रग्जचा पुरवठा; मोठ्या ड्रग कार्टेलशी संबंध

    Bollywood Drug Case : ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेला अभिनेता अरमान कोहलीची कोठडी 1 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) मते, अरमान कोहलीच्या मोबाइल फोनमधून अशी माहिती प्राप्त झाली आहे, ज्यामुळे कोलंबियाच्या कुप्रसिद्ध ड्रग्ज कार्टेलशी तारा जुळत आहेत. अरमान कोहलीच्या मोबाइलमधून ड्रग्जशी संबंधित चॅट हस्तगत करण्यात आली आहे. यात अनेक वेळा पेरू आणि कोलंबियामधून ड्रग्जच्या पुरवठ्याचा उल्लेख केला जात आहे. अरमान कोहलीला सोमवारी ड्रग पॅडलर अजय सिंहसह एनडीपीएस कोर्टात हजर करण्यात आले. Bollywood Drug Case Armaan Kohlis mobile chat revealed drugs were came from Peru Colombia big drug cartels


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेला अभिनेता अरमान कोहलीची कोठडी 1 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) मते, अरमान कोहलीच्या मोबाइल फोनमधून अशी माहिती प्राप्त झाली आहे, ज्यामुळे कोलंबियाच्या कुप्रसिद्ध ड्रग्ज कार्टेलशी तारा जुळत आहेत. अरमान कोहलीच्या मोबाइलमधून ड्रग्जशी संबंधित चॅट हस्तगत करण्यात आली आहे. यात अनेक वेळा पेरू आणि कोलंबियामधून ड्रग्जच्या पुरवठ्याचा उल्लेख केला जात आहे. अरमान कोहलीला सोमवारी ड्रग पॅडलर अजय सिंहसह एनडीपीएस कोर्टात हजर करण्यात आले.

    मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या मते, NDPS (Narcotic Drugs and Psychotropic Substances) Act 1985 अन्वये ही चॅटिंग अरमान कोहली आणि इतरांविरोधात ठोस पुरावा सिद्ध होईल. त्यांनी दावा केला आहे की, अरमान ड्रग्जव्यतिरिक्त इतर काही गंभीर प्रकरणांतही आरोप आहे. एनसीबी कोहलीच्या ड्रग्ज खरेदीशी संबंधित आर्थिक व्यवहारांची चौकशी करत आहे. जर ड्रग्ज मनीचा माग सापडला तर अरमान कोहलीच्या अडचणी वाढतील असे मानले जाते. या प्रकरणात अजय राजू सिंह, अरमान कोहलीच्या ड्रग नेक्ससमध्ये रशियन आणि नायजेरियन लोकांचे दुवेदेखील सापडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुरवठादार अजय राजू सिंह कोलंबिया आणि पेरू येथून ड्रग्जची मागणी करत होता.

    अजय राजू सिंह वेश्याव्यवसाय आणि ड्रग्ज रॅकेटमध्ये

    मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय राजू सिंह कथितपणे वेश्या व्यवसाय आणि ड्रग्ज रॅकेट चालवतो. अरमान कोहलीसाठी तो ड्रग्जचा मुख्य पुरवठादार आहे. त्याच्या अटकेच्या वेळी अरमान कोहली 1.2 ग्रॅम कोकेनसह सापडला होता, जे सेवन केलेले प्रमाण आहे. सोमवारी 2 ड्रग्ज पुरवठादारांना NCB ने जुहू परिसरातून काही प्रमाणात एमडीसह पकडले. कोहली आणि अजय सिंह यांना NCB ने 28 ऑगस्ट रोजी अभिनेत्याच्या मुंबईतील निवासस्थानी छापा टाकल्यानंतर अटक केली आणि एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

    Bollywood Drug Case Armaan Kohlis mobile chat revealed drugs were came from Peru Colombia big drug cartels

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!