• Download App
    BMC Yashwant Jadhav Properties : यशवंत जाधव आणि सहकाऱ्यांचा "पराक्रम"; अवघ्या 2 वर्षांत तब्बल 36 मालमत्तांची खरेदी!! । BMC Yashwant Jadhav Properties: "Power" of Yashwant Jadhav and colleagues; Purchase of 36 properties in just 2 years !!

    BMC Yashwant Jadhav Properties : यशवंत जाधव आणि सहकाऱ्यांचा “पराक्रम”; अवघ्या 2 वर्षांत तब्बल 36 मालमत्तांची खरेदी!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांचे निकटवर्ती अग्रवाल यांनी दोन वर्षांमध्ये तब्बल 36 मालमत्तांची खरेदी केल्याची माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मधील सूत्रांनी दिली आहे. BMC Yashwant Jadhav Properties: “Power” of Yashwant Jadhav and colleagues; Purchase of 36 properties in just 2 years !!

    इन्कम टॅक्स डिपार्टमेंट अधिकाऱ्यांनी नुकतीच यशवंत जाधव आणि त्यांच्या शी संबंधित कंत्राटदारांच्या तब्बल 35 मालमत्तांवर छापे घातले होते. त्यासंबंधीची कागदपत्रे त्यांनी मिळवली आहेत आणि यातून एक धक्कादायक खुलासा झाला असून यशवंत जाधव आणि त्यांचे निकटवर्ती अग्रवाल यांनी अवघ्या 2 वर्षात तब्बल 36 मालमत्तांची खरेदी केल्याची माहिती या कागदपत्रांमधून पुढे आली आहे. झी 24 तास आणि एबीपी माझा या वाहिन्यांकडे त्यासंबंधीची कागदपत्रे असल्याची बातमी त्यांनी दिली आहे.



    यशवंत जाधव आणि त्यांचा निकटवर्तीय अग्रवाल यांनी खरेदी केलेल्या सर्व मालमत्ता मुंबईत आणि परिसरातील आहेत. 36 मालमत्तांचा खरेदी व्यवहार हे गेल्या 2 वर्षांत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

    कोणत्या वर्षात किती मालमत्ता खरेदी ?

    • 2020 – 07
    • 2021 – 24

    कोणत्या महिन्यात किती मालमत्ता खरेदी ?

    • मार्च 2020     – 1
    • डिसेंबर 2020    – 2
    • जानेवारी 2021 – 3
    • फेब्रुवारी 2021 – 2
    • मार्च 2021 – 5
    • मे 2021 – 1
    • जून 2021 – 2
    • जुलै 2021 – 6
    • ऑगस्ट 2021 – 2
    • डिसेंबर 2021 – 3

    मालमत्तेचा पत्ता आणि किंमत

    • वॉटर फिल्ड  5 कोटी 10 लाख 
      क्रॉस रोड IV, वांद्रे 
    • बिलखाडी चेंबर्स 2 कोटी 
      माझगाव 
    • वाडी बंदर, माझगाव 1 कोटी 60 लाख 
    • व्हिक्टोरीया गार्डन2 कोटी 20 लाख 
      भायखळा 

    BMC Yashwant Jadhav Properties: “Power” of Yashwant Jadhav and colleagues; Purchase of 36 properties in just 2 years !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ