विशेष प्रतिनिधी
मुंबई : जुहू समुद्रकिनाऱ्यावर गेले दोन दिवस ब्ल्यू बॉटल जेलीफिशचा वावर आढळला आहे. जेली फिशचा दंश वेदनादायक असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भातील फलक समुद्रकिनारी लावण्यात आले आहेत. Blue Bottel Jelifish seen on sea shore In Juhu
रविवारी जुहू समुद्रकिनारी ‘ब्ल्यू बॉटल जेलीफिश’चा वावर आढळला. त्यांची संख्या तुलनेने कमी झाली असली, तरी काही ‘जेली फिश’ किनाऱ्यावर येत आहेत. लॉकडाउन काळात किनाऱ्यावर येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी आहे; तरीही ‘जेली फिश’पासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसाळ्यात हे मासे किनारी भागात येतात.
रविवारी ब्लू बॉटल जेलीफिश किनारी भागात आल्याचा अंदाज समुद्री जीव अभ्यासकांनी वर्तवला आहे. याची माहिती मिळताच संस्थेच्या त्यांनी समुद्रकिनारी धाव घेतली. जेलीफिशचा दंश झाल्यास कुणाशी संपर्क करावा किंवा कोणते उपचार घ्यावेत, याबाबतची महत्त्वाची माहिती देण्यात आल्याचे अभ्यासकांनी सांगितले.
Blue Bottel Jelifish seen on sea shore In Juhu
महत्त्वाच्या बातम्या
- लालूंच्या दोन मुलांमध्ये भाऊबंदकीची ठिणगी, एकमेंकांच्या फोटोंना काळे फासू लागले राष्ट्रीय जनता दल फुटीच्या उंबरठ्यावर
- अमरसिंह यांच्या सांगण्यावरून मुलायम सिंह यादव यांनी अखिलेश यादव यांच्याकडे सोपवली पक्षाची सूत्रे, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्याही पाया पडू नका असा चाणक्यांनी दिला होता मंत्र
- उत्तर प्रदेशात १९ हिंदूंना शुध्दीकरण करून पुन्हा घेतले हिंदू धर्मात, बंजारा बांधवांचे झाले होते जबरदस्तीने धर्मांतर
- पारदर्शकतेची कमाई, भाजपाला इलेक्ट्रोरेल बॉँडच्या माध्यामतून मिळाली २,५५५ कोटी रुपयांची देणगी