• Download App
    उद्धव ठाकरेंचा ढोंगी हिंदुत्वाचा बुरखा कालच्या दसरा मेळाव्यात फाटला, तुषार भोसले यांची टीका । BJPs Acharya Tushar Bhosale Criticizes CM Uddhav Thackeray Over His Speech in Shiv Sena Dussehra Melava

    उद्धव ठाकरेंचा ढोंगी हिंदुत्वाचा बुरखा कालच्या दसरा मेळाव्यात फाटला, आचार्य तुषार भोसले यांची टीका

    Acharya Tushar Bhosale : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर आता विविध राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ठाकरेंवर टीका केली आहे. तर भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनीही ठाकरेंचा ढोंगी हिंदुत्वाचा बुरखा फाटल्याचं म्हटलं आहे. BJPs Acharya Tushar Bhosale Criticizes CM Uddhav Thackeray Over His Speech in Shiv Sena Dussehra Melava


    प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर आता विविध राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ठाकरेंवर टीका केली आहे. तर भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनीही ठाकरेंचा ढोंगी हिंदुत्वाचा बुरखा फाटल्याचं म्हटलं आहे.

    आचार्य तुषार भोसले म्हणाले की, ठाकरे कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू, अशी भाषा करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रात आमच्या भगवाधारी साधूंना ठेचून मारायला आता दीड वर्ष होत आलं. पण त्यांच्या हत्याऱ्यांना आजपर्यंत शिक्षा होऊ शकली नाही, साधं त्यांच्याविरोधात आरोपपत्र सुद्धा व्यवस्थित दाखल होऊ शकलं नाही दुसरीकडे महाराष्ट्रात येऊन हिंदू समाजाला सडका म्हणणारा शर्जील उस्मानी आज मोकाट फिरतोय, त्याला कोणताही दंड केला जात नाही आणि वरून हिंदुत्वाचा आव आणता, तुमच्या ढोंगी हिंदुत्वाचा बुरखा कालच्या दसरा मेळाव्यात फाटला आहे.

    ते पुढे म्हणाले की, एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री हा त्या राज्याचा कुटुंबप्रमुख असतो पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कुटुंब हे केवळ ठाकरे कुटुंब आहे, महाराष्ट्र हा त्यांच्या कुटुंबाचा भाग नाही हे काल त्यांनी सिद्ध केलं. महाराष्ट्राचं हे दुर्दैव आहे की इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ उद्धव ठाकरेंच्या रूपाने महाराष्ट्राला मिळाला आहे.

    दरम्यान, शिवसेनेचा दसरा मेळाव्यादरम्यान बोलत असताना शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज नागपुरात माध्यमांशी बोलत होते.

    फडणवीस म्हणाले, “तुम्ही ज्या आविर्भावात सांगताय की जनतेने भाजपला नाकारलं. तर नव्हे, जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादीला नाकारलं आणि तुम्हाला वरपास केलं. त्यामुळे हे बेईमानीने तयार झालेले सरकार आहे. आतातरी उद्धव ठाकरेंनी भाबडेपणाचा मुखवटा बाजूला सारुन सांगावं की त्यांना मुख्यमंत्रिपदाची महत्वकांक्षा होती आणि ती पूर्ण केली. दिलेला शब्दच जर पूर्ण करायचा होता तर इतर कोणा शिवसैनिकाला मुख्यमंत्री करता आलं असतं. सुभाष देसाई, दिवाकर रावते होते. मुख्यमंत्रिपदाची महत्वकांक्षा नव्हती तर नारायण राणे, राज ठाकरेंना का बाहेर जावं लागलं? मुख्यमंत्री म्हणाले की आम्हाला महाराष्ट्राचा बंगाल करायचाय, म्हणजे नक्की काय करायचंय? खंडणीबाजीमुळे बंगालमध्ये एकही उद्योग टिकलेला नाही. तुमच्या विरोधात जो बोलेल त्याचे हात पाय तोडून त्याला फासावर लटकवायचा असा महाराष्ट्र घडवायचा आहे का? आमच्यात जोवर रक्ताचा एक थेंब आहे तोवर आम्ही, महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही. महाराष्ट्र महाराष्ट्रच राहील.”

    BJPs Acharya Tushar Bhosale Criticizes CM Uddhav Thackeray Over His Speech in Shiv Sena Dussehra Melava

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य