वकिल प्रविण चव्हाण यांच्याविरुध्द भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. यामध्ये भाजपा नेते गिरीश महाजन यांच्याविरुध्द वकिल चव्हाण हे कट कारस्थान रचत असल्याचे सांगण्यात आले आहे.
प्रतिनिधी
पुणे -वकिल प्रविण चव्हाण यांच्याविरुध्द भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. यामध्ये भाजपा नेते गिरीश महाजन यांच्याविरुध्द वकिल चव्हाण हे कट कारस्थान रचत असल्याचे म्हटले आहे . एका स्टिंग ऑपरेशनमधील फुटेजद्वारे विधानसभेत सरकारी वकील प्रविण चव्हाण आणि महाविकास आघाडी सरकारवर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले होते.BJP workers file application against Adv Pravin chavhan in shivajinagar police station
त्यांनरत वकिल प्रविण चव्हाण यांनी तेजस मोरे आणि आणखी एका व्यक्तीविरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. यासंदर्भात गुन्हा दाखल होण्याअगोदरच वकिल प्रविण चव्हाण यांच्याविरोधात तक्रार अर्ज दाखल झाला आहे. या सर्व घटनाक्रमात वकिल प्रविण चव्हाण यांनी सरकारी वकिलपदाचा राजीनामा दिला आहे.
वकिल प्रविण चव्हाण यांनी मीागल आठवड्यातच तेजस मोरे आणि आणखी एका व्यक्तीविरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यांनी अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि गोपनियतेचा भंग झाला असल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे. हा पेन ड्राईव्ह तेजस मोरेनेच फडणविसांना पुरवला असल्याचा आरोप वकिल प्रविण चव्हाण यांनी केला होता.
तर अधिवेशणादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांना सरकार खोट्या गुन्हयात अडकवून मोक्का लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. यानंतर एक पेन ड्राईव्ह सभापतींकडे सादर करत खळबळ माजवून दिली होती. यामध्ये तब्बल दिडशे तासांचे रेकॉर्डींग सादर करण्यात आले होते.
यावर गदारोळ माजल्यावर वकिल प्रविण चव्हाण यांनी “या आरोपात कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही. आरोप करणाऱ्यांनी ज्या केसचा आधार घेतला आहे, त्याची कागदपत्रे जर आपण पाहिली तर त्यामध्ये दिसून येतं की गिरीश महाजनांची त्या गुन्ह्यात काय भूमिका आहे.
याचा तपास सुरु असून तपास अधिकाऱ्यांनी ही फाईल हायकोर्टात मांडली आहे .माझ्या कार्यालयात नेहमी येणारा आशील तेजस मोरे यांना आपल्या घडाळ्यात छुपा कॅमेरा लावून हे स्टिंग ऑपरेशन केलं असल्याच प्रत्युत्तर दिल होत.
BJP workers file application against Adv Pravin chavhan in shivajinagar police station
महत्त्वाच्या बातम्या
- दापोलीत जाऊ या, अनिल परबांचे रिसॉर्ट तोडूया, किरीट सोमय्या यांची घोषणा
- राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचे महाराष्ट्रात फसवणुकीचे धंदे, आघाडीच्या आमदारांच्या सरबराईची अशोक गेहलोत करताहेत किंमत वसूल!
- दाभोलकर यांच्या खुन्यांना प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ओळखले, अंदुरे आणि कळस्कर यांनीच गोळीबार केल्याचे सांगितले
- प्रतिक्रियेची घाई, सुप्रिया सुळे यांना अडचणीत नेई, एमआयएमचे कौतुक करणे पडले महागात