विशेष प्रतिनिधी
वर्धा – मनमर्जीने विद्यापीठ विधेयक कायदा पारित करून घेतल्याबद्दल त्याचा निषेध म्हणून वर्धा येथील भाजयुमो जिल्हाध्यक्ष वरूण पाठक यांच्या नेतृत्वात मुखमंत्र्यांना २० हजार पोस्टकार्ड पाठविली जाणार आहेत.BJP will send 20,000 postcards to the Chief Minister against the University Bill
वर्धा येथील पोस्ट ऑफिस येथून पत्र पाठविण्यात येत आहेत. पवित्र विद्यापीठाना तुमच्या राजकारणाचा अड्डा बनवू नका,विद्यापीठ सुधारणा विधेयक त्वरित मागे घावे, अशी मागणी पत्रद्वारे करण्यात आली.
आज पासून जिल्ह्यातील सर्व मंडळातून मुख्यमंत्री यांना पत्र पाठविण्यात सुरवात केली जाणार आहे. किमान जिल्ह्यातून २० हजार पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष वरुण पाठक यांनी सांगितले.
यावेळी भाजयुमोचे कृष्णा जोशी, घनश्याम अहेरी,अतुल देशमुख, अर्जुन जयस्वाल, मयंक खंडागळे, निखिल भेंडे, अमोल मरापे, दिपांशू पेढेकर, मंजू पाल,रवि खंडारे,बादल झामरे,सिद्देश फाये,कुणाल दूरतकर, विवेक कुबडे, विशाल पटेल,भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
BJP will send 20,000 postcards to the Chief Minister against the University Bill
महत्त्वाच्या बातम्या
- Varun Gandhi Corona Positive : वरुण गांधींना कोरोनाची लागण, ट्विट करून माहिती दिली, निवडणूक आयोगाकडे केली ही मोठी मागणी
- साहेब जादे जोरावर सिंग, फतेह सिंग यांचा शहीद दिवस 26 डिसेंबर यापुढे वीर बाल दिवस म्हणून साजरा होणार!!
- महाराष्ट्रात मिनी लॉकडाऊन : सोमवारपासून महाराष्ट्रात दिवसा कलम 144 आणि रात्री कर्फ्यू लागू, जाणून घ्या काय राहणार सुरू, काय राहणार बंद!