प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना औरंगजेब कसा वाटतो याचे वर्णन करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना तो औरंगजेब जी वाटत असेल असे म्हटले होते. BJP state president chandrashekhar bawankule targets saamna over aurangajeb issue
परंतु सामनाने बावनकुळे यांच्या तोंडीच औरंगजेब जी ही भाषा घालून त्याची बातमी प्रसिद्ध केली होती. या मुद्द्यावरून बावनकुळे यांनी सामनावर शरसंधान साधले असून सामना आता आंधळा, बहिरा आणि हिरवा झाल्याची टीका केली आहे. औरंगजेब हा क्रूरकर्माच होता. त्याने छत्रपती संभाजी महाराजांची निर्घृण हत्या केली. हेच आपण त्यावेळी नमूद केले होते. संभाजी महाराज धर्मवीर होते हीच भाजपची भूमिका आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना औरंगजेब धर्मांध वाटत नाही.
सामनाला देखील आता औरंगजेब प्रेम आले आहे. त्यातूनच त्यांनी माझ्या तोंडी औरंगजेब जी अशी भाषा घातली. पण मी वारंवार सांगतो औरंगजेब हा धर्मांध होता. क्रूरकर्मा होता. सामना आता आंधळा, बहिरा आणि हिरवा बनला आहे. त्याने आता भगवा रंग सोडून द्यावा, असे शरसंधान बावनकुळे यांनी साधले आहे.
BJP state president chandrashekhar bawankule targets saamna over aurangajeb issue
महत्वाच्या बातम्या