• Download App
    ‘’सत्तेचं व्यसन तर उद्धव ठाकरेंना लागलं होतं, त्यामुळे...’’ चंद्रशेखर बावनकुळेंचे टीकास्त्र!BJP state president Chandrashekhar Bawankule criticized Uddhav Thackeray and Mahavikas Aghadi

    ‘’सत्तेचं व्यसन तर उद्धव ठाकरेंना लागलं होतं, त्यामुळे…’’ चंद्रशेखर बावनकुळेंचे टीकास्त्र!

    ‘’…म्हणून तिन्ही पक्षाचे लोक बावचळलेल्या परिस्थितीत सत्तेसाठी एकत्र येत आहेत.’’ असंही बावनकुळेंनी म्हटलं आहे.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे. ” महाविकास आघाडीतील तिन्ही ,पक्षांचा एकच उद्देश आहे, सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता’’ असं बावनकुळेंनी म्हटलं आहे. BJP state president Chandrashekhar Bawankule criticized Uddhav Thackeray and Mahavikas Aghadi

    भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, ‘’सत्तेचं व्यसन तर उद्धव ठाकरेंना लागलं होतं, सत्तेच्या व्यसनामुळे उद्धव ठाकरे आजरी पडले होते. त्यांनी भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसून २०१९मध्ये त्या व्यसानापाई जाऊन, मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीच्या व्यसनापाई आम्हाला सोडलं आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले. त्यामुळे सत्तेचं व्यसन हे उद्धव ठाकरेंना लागलं, आम्हाला कधीच लागत नाही. सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता मानणारे आम्ही कार्यकर्ते नाही. सत्ता हे साधन आहे आणि या साधनाने समाजाच्या शेवटच्या घटकाचे किती काम करता येईल या भूमिकेत आहोत.’’

    याशिवाय ‘’सत्ता हे आमच्यासाठी साध्या नाही, उद्धव ठाकरेंसाठी सत्ता हे साध्य आहे. म्हणून तिन्ही पक्षाचे लोक बावचळलेल्या परिस्थितीत सत्तेसाठी एकत्र येत आहेत. याचा उद्देश काय, विचारधारा एक आहे का? तर विचारधारा वैगेरे काही नाही, त्यांचा एकच उद्देश आहे सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता. पुन्हा महाराष्ट्राला डूबवायचं महाराष्ट्राचा सत्यानाश करायचा, जसा अडीच वर्षांत महाराष्ट्राचा सत्यानाश झाला, तसा त्यांचा विचार आहे.’’ असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

    BJP state president Chandrashekhar Bawankule criticized Uddhav Thackeray and Mahavikas Aghadi

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!