केशव उपाध्ये यांनी केली आहे टीका, जाणून घ्या काय म्हणाले आहेत?
विशेष प्रतिनिधी
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर टीका केली आहे. याशिवाय आजही लोकांना तेच मुख्यमंत्री हवे असल्याचा सुरही काढला आहे. यावर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. BJP spokesperson Keshav Upadhye criticized Uddhav Thackeray
केशव उपाध्ये म्हणतात, ‘’राज्यातील मविआ सरकार जनतेचा कौल नाकारून बनवलं होतं. त्या सरकारचे मुख्यमंत्री नव्हे खुर्चीमंत्री होते ते आज म्हणतायत की आजही लोकांना तेच मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत. अरे, ये मुंगेरीलाल के हसीन सपने कितने दिन देखोगे?’’
याचबरोबर ‘’तुम्हाला जनतेनी कधीच नाकारलं आहे. स्वतःचं काहीच कर्तृत्व नसलं की मग वडिलांच्या पुण्याईच्या जोरावर सहानुभूतीची मतं मिळवावी लागतात. पण ते हे विसरलेत की सहानुभूती सुद्धा त्यालाच मिळते जो त्याच्या पात्र आहे.’’ असंही उपाध्येंनी म्हटलं आहे.
याशिवाय ‘’शिंदे फडणवीस सरकार एकत्रितपणे, जनहितार्थ कामं करत असताना खुर्चीवर बसून राहण्यासाठी धोका दिलेल्यांच्या पोटात दुखणारच. जनतेला सगळं दिसतंय, कळतंय. योग्य वेळी जनता माजी खुर्चीमंत्र्यांना त्यांच्या मनातले मुख्यमंत्री कोण आहेत ते दाखवणारच! तोवर त्यांचं स्वप्नरंजन चालू राहूदे!’’ असं म्हणत केशव उपाध्येंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
BJP spokesperson Keshav Upadhye criticized Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या
- केरळमध्ये पोलिस आणि अभाविप कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष, लाठीचार्ज आणि वॉटर कॅननचा मारा; 14 वर्षांपूर्वी अवयवदानात नियम मोडल्याचा आरोप
- ‘Biporjoy मुळे एकही जीव गेला नाही! अमित शाह यांनी म्हणाले, ‘’हे टीमवर्कचे उत्कृष्ट उदाहरण’’
- काँग्रेसमध्ये जाण्याऐवजी मी विहिरीत उडी घेईन, नितीन गडकरींनी सांगितला किस्सा, म्हणाले- माझा भाजपच्या विचारधारेवर पूर्ण विश्वास
- WATCH : कुस्तीपटू साक्षी मलिकचा व्हिडिओतून नवा दावा, भाजपच्या 2 नेत्यांनी धरणे द्यायला मदत केली, परवानगीही मिळवून दिली