• Download App
    BJP-SHIVSENA : शिवसेनेला भाजपची सोडवेना साथ-पुन्हा घातली साद ! 'भावी’ काळात एकत्र औरंगाबाद महापालिकेत शिवसेना-भाजप युतीचे संकेत। BJP-SHIVSENA: BJP-Shiv Sena together! Signs of Shiv Sena-BJP alliance in Aurangabad Municipal Corporation?

    BJP-SHIVSENA : शिवसेनेला भाजपची सोडवेना साथ-पुन्हा घातली साद ! ‘भावी’ काळात एकत्र औरंगाबाद महापालिकेत शिवसेना-भाजप युतीचे संकेत

    • औरंगाबादमध्ये शिवसेनेचे अब्दुल सत्तार भाजपच्या शहराध्यक्षांच्या घरी

    • स्थानिक पातळीवर शिवसेना आणि भाजप नेते महापालिकेत युतीसाठी इच्छुक

    • अगदी पाच महिन्यांवर येऊन ठेपलेल्या औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी युतीची तयारी

    विशेष प्रतिनिधी

    औरंगाबाद : औरंगाबाद महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजप युती होणार असे संकेत मिळत आहेत. शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादच्या भाजप शहाराध्यक्षांची चक्क घरी जाऊन भेट घेतली. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मनातली इच्छा ‘आजी-माजी’ एकत्र येऊन ‘भावी’ सहकारी होणार यात शंका नाही. BJP-SHIVSENA: BJP-Shiv Sena together! Signs of Shiv Sena-BJP alliance in Aurangabad Municipal Corporation?

    मंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादचे भाजप शहराध्यक्ष संजय केनेकर यांची घरी जाऊन भेट घेतली. अब्दुल सत्तार यांनी थेट घरी जाऊन शहाराध्यक्षांची भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. भाजप-शिवसेना युतीसाठी अब्दुल सत्तार सक्रिय झाल्याची चर्चा आधीपासून होती. काही दिवसांपूर्वी अब्दुल सत्तार यांनी केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांची भेट घेत युतीचे संकेत दिले होते. औरंगाबादमध्ये स्थानिक पातळीवर शिवसेना आणि भाजप नेते महापालिकेत युतीसाठी इच्छुक आल्याची सूत्रांची माहिती आहे. अगदी पाच महिन्यांवर येऊन ठेपलेल्या औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी युतीची तयारी होताना दिसत आहे.

    औरंगाबाद महापालिका पक्षीय बलाबल

    • शिवसेना – 29
    • भाजप – 22
    • एमआयएम – 25
    • कॉंग्रेस – 10
    • राष्ट्रवादी – 03
    • बसप – 05
    • रिपब्लिकन पक्ष – 01
    • अपक्ष – 18

    भाजप-शिवसेना युतीची सत्ता गेली 30 वर्ष औरंगाबाद महापालिकेवर आहे. मात्र राज्यातील युती तुटल्यापासून औरंगाबाद महापालिकेतही याचे पडसाद जाणवू लागले. भाजपच्या विजय औताडे यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात उपमहापौरपदाचा राजीनामा दिला होता. मात्र महाविकास आघाडीमुळे औरंगाबाद महापालिकेत उपमहापौरपद खेचून आणण्यात शिवसेनेला यश आलं. औरंगाबादच्या उपमहापौरपदी शिवसेनेच्या राजेंद्र जंजाळ यांची निवड झाली.

    औरंगाबादेत सेना-भाजप युतीचीही चर्चा

    औरंगाबाद महापालिकेत मनसे आणि भाजप युती होण्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक यंदाही बहुरंगी होण्याची चिन्हं आहेत. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली, तरी औरंगाबादेतील सत्ताधारी शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत न घेता रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यांच्यासमोर भाजप, एमआयएम या पक्षांचं आव्हान असेल. तर मनसेही पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहे.

    कार्यकाळ संपून वर्ष उलटलं

    औरंगाबाद महापालिकेचा कार्यकाळ संपून वर्ष उलटले आहे. आधी गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील सर्वच निवडणुका स्थगित झाल्यामुळे औरंगाबाद महापालिका इलेक्शनलाही ब्रेक लागला होता. नंतर औरंगाबादमधील प्रभाग रचनेवरील आक्षेप याचिकेमुळे सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली होती.

    BJP-SHIVSENA: BJP-Shiv Sena together! Signs of Shiv Sena-BJP alliance in Aurangabad Municipal Corporation?

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!