• Download App
    भाजपा- शिवसेनेची मुंबईत सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये आशीर्वाद यात्रा; पण साध्य काय करणार?? BJP-Shiv Sena's Ashirwad Yatra in six Lok Sabha constituencies in Mumbai

    भाजपा- शिवसेनेची मुंबईत सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये आशीर्वाद यात्रा; पण साध्य काय करणार??

    प्रतिनिधी

    मुंबई : रविवारपासून मुंबईतील सर्व सहा लोकसभा मतदारसंघात भाजपा – शिवसेनेची आशीर्वाद यात्रा सुरू होत असल्याची माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड. आशिष शेलार यांनी आज शनिवारी, ४ मार्च रोजी दिली. BJP-Shiv Sena’s Ashirwad Yatra in six Lok Sabha constituencies in Mumbai

    नुकत्याच नुकत्याच झालेल्या पदवीधर शिक्षक मतदार संघाची विधान परिषद निवडणूक आणि त्यानंतर झालेली कसबा, चिंचवडची पोटनिवडणूक या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला फार मोठे आव्हान निर्माण केल्याचा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हा नॅरेटिव्ह पूर्णपणे सेट होण्यापूर्वीच, तो उध्वस्त करणे भाजपला आणि शिंदे गटाला महत्त्वाचे वाटत आहे. आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने जनसंपर्काबरोबरच भाजपला फार मोठे आव्हान ठाकरे गट आणि राष्ट्रवादीने उभे केल्याचा नॅरेटिव्ह तोडण्याचा भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष प्रयत्न करतील.

    हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि शिवसेना हा पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहेत. भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून याच अनुषंगाने भाजपा आणि शिवसेना यांच्यावतीने मुंबईतील सहा लोकसभा क्षेत्रात आशीर्वाद यात्रा रविवारी, ५ मार्चपासून सुरू होत आहे. दीड-दोन तासांचा प्रवास करून प्रत्येक लोकसभेतील एका पावन प्रसिद्ध मंदिरात दर्शन घेऊन यात्रा पुढे जाईल. अशाप्रकारे सहा यात्रा संपन्न होतील, अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली.

    शिवतीर्थावर ‘जाणता राजा’ महानाट्य

    शेलार म्हणाले, ५ मार्च, ९ आणि ११ मार्च रोजी प्रत्येकी दोन लोकसभा क्षेत्रात आशीर्वाद यात्रा होईल. त्यानंतर १४ मार्चला दादर येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित ‘जाणता राजा’ महानाट्य होईल असेही ते म्हणाले.

    BJP-Shiv Sena’s Ashirwad Yatra in six Lok Sabha constituencies in Mumbai

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ