• Download App
    ‘भविष्यवाणी सांगता सांगता खोटं बोलण्याचा पण धंदा सुरू केला काय तुम्ही?’’ भाजपाचा जयंत पाटलांना टोला!BJP responds to NCP state president Jayant Patil for criticizing Shinde Fadnavis government

    ‘भविष्यवाणी सांगता सांगता खोटं बोलण्याचा पण धंदा सुरू केला काय तुम्ही?’’ भाजपाचा जयंत पाटलांना टोला!

    शिंदे-फडणवीस सरकारवर केलेल्या टीकेला मुद्देसूद दिलं आहे उत्तर ;  ‘’एवढी वर्षे हातचलाखी केली, अजूनही… ’’ असंही भाजपाने म्हटलं आहे.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केलेल्या टीकेला भाजपाकडून मुद्देसूद आणि आकडेवारीसह जोरदार प्रत्युत्त देण्यात आलं आहे. ‘’महाविकास आघाडी सरकारने गेल्या अर्थसंकल्पामध्ये मागासवर्गीयांच्या कल्याण योजनांसाठी केलेल्या तरतुदीमध्ये सध्याच्या सरकारने मोठी कपात केली आहे.’’  असं जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. BJP responds to NCP state president Jayant Patil for criticizing Shinde Fadnavis government

    यावर भाजपाने म्हटलं की,‘’जयंतराव आजकाल भविष्यवाणी सांगता सांगता खोटं बोलण्याचा पण धंदा सुरू केला काय तुम्ही?   राज्याच्या आजपर्यंतच्या इतिहासात मागासवर्गीय समाजासाठी कधीच एवढी मोठी तरतूद करण्यात आली नव्हती. २०२३-२४ साठी तब्बल १६ हजार ४९४ कोटींची तरतूद मागासवर्गीयसाठी करण्यात आली आहे.’’


    संजय राऊतांना धमक्या, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना टोला, झेपत नसेल तर गृह मंत्रालय सोडा; पण ईडी कोठडीतल्या गृहमंत्र्यांना ते झेपत होते का??


    याशिवाय ‘’या बजेट मध्ये सामाजिक न्याय विभागासाठी निधीमध्ये सुमारे ३० टक्के वाढ करण्यात आली आहे. ही वाढ मागील चार वर्षातील बजेट पेक्षा जास्त आहे. गेल्या ४ वर्षांत जी तरतूद अनुक्रमे ९ हजार २०८ कोटी रुपये, ९ हजार ६६८ कोटी रुपये, १० हजार ६३५ कोटी रुपये, १२ हजार २३० कोटी रुपये इतकी होती. २०१३-१४ च्या बजेट मध्ये तुमच्या सरकारने मागासवर्गीय समाजासाठी केलेली ४ हजार ७८७ कोटी एवढी होती. या तरतुदींच्या जवळपास तीन पट एवढी आहे. यावर्षी २०२३-२४ मध्ये १६ हजार ४९४ कोटी रुपये इतकी आहे. ही वाढ जवळपास ३० टक्के आहे.’’ असंही सांगण्यात आलं आहे.

    तुम्ही ढीगभर घोषणा केल्या, पण … –

    ‘’एवढी वर्षे हातचलाखी केली, अजूनही राज्यातील जनतेला खोटं बोलून, भ्रमित करत आहात. एखाद्या योजनेला प्रतिसाद मिळत नसेल तर, त्या योजनेत वाढीव तरतूद करून काय साध्य करतात? मागील अडीच वर्षाच्या काळात तुम्ही ढीगभर घोषणा केल्या पण, जनतेच्या हातात भोपळाच पडला होता. ‘स्टँड अप इंडिया’या योजनेत मागासवर्गीय तरुणांना उद्योगांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी २०१९-२० मध्ये २५ कोटी रुपये तरतूद करण्यात आली, मात्र खर्च एकही रुपया झाला नाही.’’

    सविस्तर वार्षिक आकडेवारी –

    ‘’२०२०-२१ मध्ये २५ कोटींची तरतूद आणि ६.८३ कोटी रुपये खर्च, २०२१-२२ मध्ये ७५  कोटींची तरतूद आणि खर्च ५.६९ कोटी रुपये.  २०२२-२३ मध्ये १०० कोटींची तरतूद केली. मात्र, प्रतिसाद नसल्याने खर्च झालेला नाही. त्यामुळे यावर्षी १० कोटींची तरतूद करण्यात आली. अनुसूचित जातीतील तरुणांच्या शिष्यवृत्तीची परिस्थिती देखील तशीच आहे. शिष्यवृत्तीसाठी २०१९-२० मध्ये ५० कोटी तरतूद आणि १८१ लाभार्थी. २०२०-२१ मध्ये २४ कोटी तरतूद आणि १३९ लाभार्थी, २०२१-२२ मध्ये १०० कोटी तरतूद आणि ५३ कोटी खर्च, २०२२-२३ मध्ये १५० कोटी रुपये तरतूद आणि ५५ कोटी रुपये खर्च अशी स्थिती आहे. मागासवर्गीय वस्ती सुविधांच्या बाबतीत सुद्धा तीच स्थिती आहे. २०१९-२० मध्ये ३०० कोटी तरतूद फक्त १७३ कोटींचा खर्च, २०२०-२१ मध्ये १२५ कोटी रुपये तरतूद खर्च फक्त ४१ कोटी रुपये, २०२१-२२ मध्ये १००० कोटी रुपये तरतूद खर्च फक्त ६५० कोटी रुपये, २०२२-२३ मध्ये १२०० कोटी रुपये तरतूद आणि ८४० कोटी रुपये खर्च. खर्चाच्या प्रमाणातच तरतूद केली आहे.’’

    …त्यामुळे इंदू मिल मधील स्मारकाची चिंता तुम्ही करू नका. –

    ‘’जयंतराव अर्थसंकल्प सादर करताना अर्थसंकल्पीय तरतुदी केल्या जातात. एखाद्या योजनेत खर्च वाढत गेल्यास पुरवणी मागण्यांमधून पुन्हा त्यासाठी तजवीज केली जाते. हे तुम्हाला माहिती असूनही खोटं, भ्रमित करणारं ट्विट तुम्ही केलात. इंदूमिल स्मारकासाठी ७४१ कोटी रुपये देण्यात येतील, असा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अर्थसंकल्पीय भाषणातच उल्लेख आहे. त्यामुळे इंदू मिल मधील स्मारकाची चिंता तुम्ही करू नका. स्मारक बांधण्यास सरकार समर्थ आहे. तेवढं जनतेला खोटं सांगून फसवू नका.’’ अशा शब्दांमध्ये भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

    जयंत पाटील यांनी काय केले आहेत आरोप? –

    ‘’महाविकास आघाडी सरकारने गेल्या अर्थसंकल्पामध्ये मागासवर्गीयांच्या कल्याण योजनांसाठी केलेल्या तरतुदीमध्ये सध्याच्या सरकारने मोठी कपात केली आहे. याचा फटका मागासवर्गीयांच्या अनेक योजनांना बसला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेची मूळ अर्थसंकल्पातील तरतूद १२०० कोटींवरून ८४० कोटी.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाच्या तरतुदीमध्येही कपात.  ‘स्टँड अप इंडिया’ योजनेची मूळ अर्थसंकल्पातील असलेली १०० कोटी रुपयांची तरतूद कमी करून १० कोटी करण्यात आली. विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना विविध कारवाया करून टार्गेट करणे, महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देणे असे अनेक उद्योग झाल्यानंतर, आता मागासवर्गीयांच्या हक्काच्या निधीला कात्री लावण्याचे पाप सरकार करत आहे. त्याचा आम्ही निषेध करतो.’’ असं जयंत पाटील यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

    BJP responds to NCP state president Jayant Patil for criticizing Shinde Fadnavis government

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस