• Download App
    ‘’माणूस पिसाळला की, त्याला भान राहत नाही, महाराष्ट्राला लागलेला तुम्ही कलंक आहात’’ BJP responded to Uddhav Thackerays criticism of Deputy Chief Minister Devendra Fadnavis

    ‘’माणूस पिसाळला की, त्याला भान राहत नाही; महाराष्ट्राला लागलेला तुम्ही कलंक आहात’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंवर पलटवार!

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेला दिलं प्रत्युत्तर

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : शिवसेना(ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे कालपासून  दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात फूट पडल्यानंतर प्रथमच  उद्धव ठाकरे भाजपाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ आणि वाशिमला भेट देणार आहेत.  दरम्यान, काल नागपूरमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंक असल्याची जहरी टीका केली. त्या टीकेला आता भाजपाकडूनही जोरदार प्रत्त्युत्तर दिले गेले आहे. BJP responded to Uddhav Thackerays criticism of Deputy Chief Minister Devendra Fadnavis

    ‘’उद्धव ठाकरे आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर ” नागपूरला लागलेला कलंक” अशी घाणेरडी टीका करण्यापूर्वी स्वतःचा चेहरा आरशात बघितला असता, तर तुमचा कलंकित आणि भ्रष्ट चेहरा तुम्हालाच दिसला असता.’’ असं महाराष्ट्र भाजपाने ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

    याशिवाय, ‘’उद्धव ठाकरे, तुम्हाला वेड लागले आहे. ‘भाजपा नेते मर्दाची औलाद असतील तर”अशी सडकछाप भाषा तुम्हीच वापरू शकता. माणूस पिसाळला की, त्याला भान राहत नाही. महाराष्ट्राला लागलेला तुम्ही कलंक आहात. वेड्यांचा इस्पितळात तुमच्यावर उपचार करण्याची गरज आहे. या कलंकित आजारातून लवकर बरे व्हा.’’ अशा शब्दांमध्ये भाजपाकडून उद्धव ठाकरेंवर पलटवार करण्यात आला आहे.

    उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले? –

    “देवेंद्र फडणवीस हे नागपुराला लागलेले कलंक आहेत. आता सांगत आहेत, उद्धव ठाकरेंनी पाठित खंजीर खुपसला म्हणून आम्ही यांच्याबरोबर गेलो. पहिलं उद्धव ठाकरेच्या पाठित खंजीर कुणी खुपसला? २०१४ ते २०१९ तुमच्याबरोबर सत्तेत होतो. २०१४ साली शिवसेनेनं नाहीतर, तुम्ही युती तोडली. तेव्हा मी काँग्रेसबरोबर गेलो नव्हतो. मी तिथेच होतो आणि तिथेच आहे. वार करणारी तुमची अवलाद आहे.” अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर टीका  केली होती.

    BJP responded to Uddhav Thackerays criticism of Deputy Chief Minister Devendra Fadnavis

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ