Narayan Rane Arrest : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधातील वादग्रस्त वक्तव्याबद्दल नाशिक पोलिसांनी आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी जिल्ह्यातून अटक केली. राणे जन आशीर्वाद यात्रेत होते. पोलिसांनी म्हटले की, ताब्यात घेतल्यानंतर राणे यांना संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. आता त्यांना न्यायालयात हजर केले जाईल. BJP President JP Nadda Criticizes Thackeray Govt Over Union Minister Narayan Rane Arrest
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधातील वादग्रस्त वक्तव्याबद्दल नाशिक पोलिसांनी आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी जिल्ह्यातून अटक केली. राणे जन आशीर्वाद यात्रेत होते. पोलिसांनी म्हटले की, ताब्यात घेतल्यानंतर राणे यांना संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. आता त्यांना न्यायालयात हजर केले जाईल.
पोलिसांच्या या पावलावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ट्वीट केले की, “केंद्रीय मंत्री नारायण राणे जी यांना महाराष्ट्र सरकारने अटक करणे हे घटनात्मक मूल्यांचे उल्लंघन आहे. अशा कृतीमुळे आम्ही घाबरणार नाही किंवा दडपणार नाही. हे लोक जन-आशीर्वाद यात्रेत भाजपाला मिळत असलेल्या प्रचंड पाठिंब्यामुळे त्रस्त आहेत. आम्ही लोकशाही पद्धतीने लढत राहू, यात्रा सुरूच राहील.”
चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
दुसरीकडे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एका केंद्रीय कॅबिनेट मंत्र्याला अटक करण्याची घटना घडत आहे. हा सत्तेचा गैरवापर आहे. आम्ही हे सहन करणार नाही. ते म्हणाले की, प्रत्येक खासदाराला काही अधिकार आहेत, त्या अधिकारांचे उल्लंघन झाले आहे. आमचे सर्व खासदार याप्रकरणी लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेच्या अध्यक्षांना याचिका सादर करतील.
फडणवीस काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. मुळात राणे साहेब बोलण्याच्या ओघात हे झालं असावं. पण मुख्यमंत्री स्वातंत्र्यदिन विसरतात तेव्हा कोणाच्याही मनात राग निर्माण होऊ शकतो. मुख्यमंत्रिपदाची गरिमा राखली पाहिजे. फडणवीस पुढे म्हणाले की, एखाद्याच्या मनात संताप निर्माण होऊ शकतो, पण तो वेगळ्या पद्धतीने निषेध म्हणून व्यक्त केला जाऊ शकतो. हे सांगत असताना यामध्ये सरकार ज्या पद्धतीने कारवाई करत आहे, त्याचं बिलकुल समर्थन करू शकत नाही. एखाद्याने वासरू मारलं म्हणून आम्ही गाय मारू, असं सरकार वागत असेल तर एक गोष्ट सांगतो, भाजप राणे साहेबांच्या त्या वक्तव्याच्या पाठीशी नसेल, पण भाजप पूर्णपणे नारायणराव राणे यांच्या पाठीशी उभा राहील आणि राहतोय, अशी भूमिका फडणवीसांनी मांडली.
नारायण राणे नेमकं काय म्हणाले होते?
रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हीरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हीरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, अशा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.
BJP President JP Nadda Criticizes Thackeray Govt Over Union Minister Narayan Rane Arrest
महत्त्वाच्या बातम्या
- WATCH : पोलिसांनी भरल्या ताटावरून राणेंना उठवलं? प्रसाद लाड यांचा गंभीर आरोप, म्हणाले- ‘तुम्ही साहेबांचा रस्त्यात खून कराल!’
- ओवेसी अफगाणिस्तानबाबत परराष्ट्र मंत्रालयाच्या ब्रीफिंगलाही उपस्थित राहतील, 26 ऑगस्ट रोजी सर्वपक्षीय बैठक होईल
- BIG BREAKING : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलीसांकडून अटक
- रत्नागिरी सत्र न्यायालयाने नारायण राणेंचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज फेटाळला; राणेंची उच्च न्यायालयात धाव, पण…
- WATCH : भाजप कार्यालयावरील हल्ले खपवून घेणार नाही देवेंद्र फडणवीस यांची हल्लेखोरांवर कारवाईची मागणी