• Download App
    भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी यांची वेबसाईट हॅक झाल्याने खळबळ ; पाकिस्तानी हॅकरचे कृत्य ?। BJP MP Gopal Shetty's website hacked; The act of a Pakistani hacker?

    भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी यांची वेबसाईट हॅक झाल्याने खळबळ ; पाकिस्तानी हॅकरचे कृत्य ?

    वृत्तसंस्था

    मुंबई : दक्षिण मुंबईतील भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी यांची वेबसाईट हॅक करण्यात आली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींमध्ये खळबळ उडाली आहे. पाकिस्तानातील हॅकरचा यामध्ये हात असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. BJP MP Gopal Shetty’s website hacked; The act of a Pakistani hacker?

    पाकिस्तानातील दहशतवादी संघटना अथवा आयएसआय या गुप्तहेर संघटनेच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या भारतातील काही छोट्या-मोठ्या दहशतवादी संघटना दहशतवादी कारवायांद्वारे दहशतवाद पसरवत असतात. अशा संघटना भारतातील सरकारी आस्थापने, मोठ्या कंपन्या, बँका यांच्या वेबसाईट हॅक करतात. त्याद्वारे सायबर क्षेत्रातही दहशतवाद पसरवतात. अशाच प्रकारे लोकप्रतिनिधींचीही वेबसाईट हॅक करत असतात. त्यानुसार भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांचीही वेबसाईट हॅक करण्यात आली आहे.


    तीन तास ठप्प राहिल्यानंतर ट्विटरची सेवा पुन्हा सुरू, डेस्कटॉप युजर्सना येत होती अडचण


    हॅकरने काय म्हटले आहे या वेबसाईट्वर?

    http://gopalshetty.com/ अशी खासदार गोपाळ शेट्टी यांची वेबसाईट आहे. ही वेबसाईट उघडताच त्यावर ‘गोपाळ शेट्टी (भाजप) हॅक’ असे लिहिलेले दिसते. त्यानंतर ‘मोदी इंतजार कर कुत्ते, तेरा बाप भी पाकिस्तान और आयएसआय को याद रखेगा, अब हमारी बारी’ पाकिस्तान जिंदाबाद cAtch.if.you.can@hotmail.com, Muhammad Bilal [TEAM PCE] असा संदेश त्यामध्ये दिला आहे.

    केंद्रीय गृहराज्यमंत्री यांची वेबसाईट हॅक झाली!

    भाजपचे दक्षिण मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी सध्या मतदार संघात फिरून लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्यावर ते नेहमी कडक शब्दांत निषेध नोंदवतात. त्यामुळे ते पाकिस्तानी दहशतवादी संघटनांच्या रडारवर आहेत. लोकप्रतिनिधींची वेबसाईट हॅक होणे ही पहिली वेळ नाही. याआधी केंद्रीय गृहराज्य मंत्री किसन रेड्डी यांचीही वेबसाईटही हॅक झाली होती.

    BJP MP Gopal Shetty’s website hacked; The act of a Pakistani hacker?

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस