BJP MLA Ganpat Gaikwad : राज्यात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. अनेक ठिकाणी बेड्स, ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. अशा कठीण काळात लोकप्रतिनिधी कुठे गेले, असा प्रश्न सर्वसामान्यांतून नेहमीच विचारला जात आहे. परंतु अशीही काही उदाहरणे आहेत ज्यांचे कौतुकच करावे लागेल. कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनीही असेच कौतुकास्पद काम केले आहे. ऑक्सिजनची कमतरता असल्याने कोविड रुग्णालय सुरू करता येत नव्हते. यामुळे ऑक्सिजन प्लांट टाकण्यासाठी आमदार गायकवाड यांनी आपल्या आमदार निधीतून तब्बल 1 कोटींचा निधी देण्याचे जाहीर केले आहे. याशिवाय आ. गायकवाड यांच्या मुलाचे लग्न होणार आहे. आपल्या मतदारसंघातील जनतेचे हाल पाहून त्यांनी मुलाचे लग्न साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नासाठी होणारा खर्च ते नागरिकांच्या लसीकरणावर करणार आहेत. BJP MLA Ganpat Gaikwad Gives Rs 1 crore for oxygen plant, vaccinating people in the expence of His Own Sons marriage
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. अनेक ठिकाणी बेड्स, ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. अशा कठीण काळात लोकप्रतिनिधी कुठे गेले, असा प्रश्न सर्वसामान्यांतून नेहमीच विचारला जात आहे. परंतु अशीही काही उदाहरणे आहेत ज्यांचे कौतुकच करावे लागेल. कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनीही असेच कौतुकास्पद काम केले आहे. ऑक्सिजनची कमतरता असल्याने कोविड रुग्णालय सुरू करता येत नव्हते. यामुळे ऑक्सिजन प्लांट टाकण्यासाठी आमदार गायकवाड यांनी आपल्या आमदार निधीतून तब्बल 1 कोटींचा निधी देण्याचे जाहीर केले आहे. याशिवाय आ. गायकवाड यांच्या मुलाचे लग्न होणार आहे. आपल्या मतदारसंघातील जनतेचे हाल पाहून त्यांनी मुलाचे लग्न साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नासाठी होणारा खर्च ते नागरिकांच्या लसीकरणावर करणार आहेत.
‘दै. लोकमत’ने दिलेल्या वृत्तानुसार, महापालिका क्षेत्रात दररोज 1700 हून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे उपचारांसाठी अनेकांची धावपळ होत आहे. आरोग्य यंत्रणेवरही प्रचंड ताण वाढला आहे. यासाठी उपाय म्हणून जास्तीत जास्त कोविड रुग्णालये सुरू करण्याचे प्रशासनाने प्रयत्न चालवले, परंतु ऑक्सिजन नसेल तर कोविड रुग्णालय उभारू नका, अशा सरकारच्या सूचना आहेत. ही अडचण दूर करण्यासाठी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी आपल्या आमदार निधीतून एक कोटी रुपये देण्याचे जाहीर केले आहे.
एवढेच नाही, तर आ. गणपत गायकवाड यांच्या मुलाचे ४ मे रोजी लग्न होणार आहे. या लग्नासाठी काही महिन्यांपासून गायकवाड कुटुंबीयांनी तयारी केली होती. परंतु, आता कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याच्या पार्श्वभूमीवर हे लग्न अत्यंत साधेपणाने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या लग्नासाठी जो खर्च लागणार होता तो सर्व पैसा आता मतदारसंघातील नागरिकांच्या लसीकरणावर खर्च करणार असल्याची माहिती आमदार गायकवाड यांनी दिली आहे.
BJP MLA Ganpat Gaikwad Gives Rs 1 crore for oxygen plant, vaccinating people in the expence of His Own Sons marriage
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यांच्या लसींबद्दलच्या प्रत्येक प्रश्नाला केंद्रीय आरोगमंत्र्यांकडून उत्तर, वाचा… डॉ. हर्षवर्धन यांच्या खुल्या पत्रातील टॉप १० मुद्दे
- आमने-सामने : संजय राऊत उघडा डोळे बघा नीट गेल्या पाच वर्षांत अर्थव्यवस्थेची प्रगती दीड पट गतीने प्रविण दरेकरांचा ‘रोखठोक’ प्रतिहल्ला
- पश्चिम बंगालमध्ये सातव्या टप्प्यातील मतदान सुरु, ३४ जागांसाठी २६८ उमेदवार रिंगणात ; सहा मतदारसंघात ‘काँटे की टक्कर’
- पुण्यातील गोडबोले कुटुंबातील तीन भावांचा कोरोनामुळे मृत्यू
- निर्णयांचा झपाटा : कोरोनाला तोंड देण्यासाठी घेतले १० दिवसांत ‘हे’ महत्त्वाचे १६ निर्णय…