- भाजप आमदार आशिष शेलार यांचे शरसंधान
प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिळून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला टकमक टोकाकडे ढकलत नेत आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा गेल्या अडीच वर्षातला राजकीय व्यवहार बघितला, तर एका पाठोपाठ एक वक्तव्ये आणि राजकीय कृती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा कडेलोट करतीलच, पण त्याचबरोबर महाराष्ट्राची जनता शिवसेनेबरोबरच काँग्रेस – राष्ट्रवादीचाही कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी दिला आहे. BJP mla ashish shelar targets ajit Pawar, Uddhav Thackeray over ajit Pawar remarks on chatrapati sambhji maharaj
छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, या अजित पवारांच्या विधानानंतर ट्विट करून काँग्रेस – राष्ट्रवादीच्या राजकीय व्यवहारावरून शेलार यांनी टिपण्णी केली आहे.
अजित पवारांच्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा नव्हता, असे वक्तव्य केले. याआधी देखील थेट दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकर हिच्याशी मनी लॉन्ड्रीग व्यवहार करून जमीन बळकावण्याचा प्रयत्न केलेल्या नवाब मलिकांच्या कारनाम्यांकडे शिवसेनेने दुर्लक्ष केले. राष्ट्रवादी काँग्रेसचा राजकीय व्यवहार बघितला तर हे सगळे त्या पक्षाने उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या नेतृत्वाखाली केले. त्यामुळे शिवसेनेला राष्ट्रवादीबाबत देखील सौम्य भूमिका घ्यावी लागली. अजितदादांच्या वक्तव्याची पाठराखण सामनाने केली.
पण या सगळ्याची स्क्रिप्ट प्रभादेवीच्या कार्यालयात बसून वेगळ्या अनाजी पंतांनी तर केली नाही ना अशी शंका येण्याची स्थिती आहे. आपला विशिष्ट राजकीय हेतू आणि स्वार्थ साधून घेण्यासाठी राष्ट्रवादी हा राजकीय वर्तन व्यवहार करत आहे पण यामुळे त्या पक्षासह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचाही राजकीय कडेलोट अटळ आहे, असे टीकास्त्र आशिश शेलार यांनी सोडले आहे.
BJP mla ashish shelar targets ajit Pawar, Uddhav Thackeray over ajit Pawar remarks on chatrapati sambhji maharaj
महत्वाच्या बातम्या