• Download App
    अहमदनगर जिल्ह्यातील एका बड्या मंत्र्यांचा भ्रष्टाचार बाहेर येणार- राधाकृष्ण विखे पाटील । BJP Leader Radhakrishna Vikhe Patil Criticized Maha Vikas Aghadi Govt, Says Soon Corruption Case Of a Minister Will Be Public

    अहमदनगर जिल्ह्यातील एका बड्या मंत्र्यांचा भ्रष्टाचार बाहेर येणार- राधाकृष्ण विखे पाटील

    भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टीका करत लवकरच एका मोठ्या मंत्र्याचा भ्रष्टाचार बाहेर येणार असल्याचे भाकीत केले आहे. BJP Leader Radhakrishna Vikhe Patil Criticized Maha Vikas Aghadi Govt, Says Soon Corruption Case Of a Minister Will Be Public


    विशेष प्रतिनिधी

    अहमदनगर : भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टीका करत लवकरच एका मोठ्या मंत्र्याचा भ्रष्टाचार बाहेर येणार असल्याचे भाकीत केले आहे.

    ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या मंत्र्यांची पापे भरली आहे. आपली पापे झाकण्यासाठी ईडी, सीबीआय यांच्यावर दोषारोप करण्याचे काम यांचं चाललं आहे कारण त्यांनी जो काही भ्रष्टाचार केला आहे, त्यामुळे या संस्था बदनाम करायच्या. पण या भ्रमात या मंत्र्यांनी राहू नये, असा सल्ला भाजपचे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना दिला आहे.

    ते पुढे म्हणाले की, यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातला एक बडा मंत्री आहे, त्याने किती मोठ्या प्रमाणात महसूल गोळा केला हेदेखील समोर येणार आहे. विखे पाटील यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर नाव न घेता आरोप केला आहे. श्रीरामपूर येथील वयोवृद्ध लोकांसाठी मोफत शिबिराचे आयोजन केलं होतं, या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख उपस्थिती आ.राधाकृष्ण विखे पाटील यांची होती. या कार्यक्रमाच्या वेळी विखे पाटलांनी पत्रकारांशी संवाद साधला.

    पुढे विखे पाटील म्हणाले की, बाळासाहेब थोरात यांना काँग्रेस पक्षामध्ये किती किंमत आहे. हे लोकांनादेखील माहिती आहे. ज्यांना सरकारमध्ये आणि पक्षामध्ये किंमत नाही त्यांच्या वक्तव्याबद्दल काय बोलणार? आपण संपूर्ण राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचाराला लोक कंटाळली आहे. आपल्या जिल्ह्यातल्यादेखील एक मोठा मंत्री त्यामध्ये अडकलेला आहे. लवकरच ते प्रकरणदेखील बाहेर येणार आहे. पूर्ण ताकदीने सर्व नगरपालिका लढवण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आहे, असेही विखे पाटील म्हणाले.

    BJP Leader Radhakrishna Vikhe Patil Criticized Maha Vikas Aghadi Govt, Says Soon Corruption Case Of a Minister Will Be Public

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Tata Cancer Hospital : मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलला धमकीचा मेल, पोलिसांनी तपास सुरू केला

    CM Fadnvis : सायबर गुन्हे घडण्यापूर्वीच रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक – मुख्यमंत्री फडणवीस

    Devendra Fadnavis : महाराष्ट्र शासन अन् विधि सेंटर फॉर लिगल पॉलिसी यांच्यात सामंजस्य करार