• Download App
    WATCH : मराठा आरक्षणासाठी वेगळे झेंडे घेऊ नका - राधाकृष्ण विखे पाटील । BJP Leader Radhakrishna Vikhe meeting in Ahemadnagar On Maratha Reservation Issue

    WATCH : मराठा आरक्षणासाठी वेगळे झेंडे घेऊ नका, गटतट विसरून एकत्र या – राधाकृष्ण विखे पाटील

    Maratha Reservation Issue : मराठा आरक्षणाचा हक्क मिळावा यासाठी भाजपाचे नेते व माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपळगाव बसवंत येथे मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. खासदार भारती पवार, आमदार दिलीप बनकर, आमदार राहुल आहेर, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, माजी सरपंच भास्कर बनकर, राजेंद्र मोगल आदी मान्यवर या बैठकीस उपस्थित होते. मराठा समाज हा आर्थिक मागास असून बेरोजगार तरुणांची संख्या वाढत आहे. त्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. मराठा समाज हा संयमाने भूमिका मांडतो, लाखोंचे मोर्चे शांततेच्या मार्गाने काढतो याचा गैर अर्थ कोणी काढू नये. पुढील काळात मराठा समाजाचा उद्रेक होऊ शकतो. मराठ्यांचा इतिहास संपूर्ण देशाला माहिती आहे, असा इशारा यावेळी अनेक मराठा नेत्यांनी दिला. आपसांत गटबाजी न करता सर्वांनी आरक्षण मिळविण्यासाठी सक्षम नेतृत्वाखाली एकाच व्यासपीठावर एकत्र यावे व मराठ्यांची शक्ती दाखवावी, असे आवाहन यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. BJP Leader Radhakrishna Vikhe meeting in Ahemadnagar On Maratha Reservation Issue

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chief Minister : वाढवण बंदरांचा जगातील पहिल्या दहामध्ये गणले जाणार, मुख्यमंत्र्यांची माहिती

    Nimisha Priya निमिषा प्रियावर फाशीची टांगती तलवार कायम, येमेनमधील न्यायप्रक्रियेवर गंभीर प्रश्न

    विधान भवनात फोटोसेशनच्या वेळी ठाकरे-शिंदे आमनेसामने; एकमेकांना पाहणेही टाळले