खेडमधील सभेत उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला दिले आहे प्रत्युत्तर, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत.
प्रतिनिधी
उद्धव ठाकरे यांनी काल रत्नागिरीतील खेडमध्ये जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. त्यांच्या टीकेला भाजपा नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. BJP leader Ashish Shelar responded to Uddhav Thackerays criticism in the Khead Rally
‘’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून ज्यांनी महाराष्ट्रात मते मिळवली आणि नंतर गद्दारी केली, तेच आज आम्हाला मोदींच्या फोटोवरून आव्हान देतात? कोकणात शिमगा असल्याने जनता फारसे गांभीर्याने घेणार नाही. कालच्या सभेतील सोंगांनी आणि बोंबा मारायच्या कार्यक्रमाने मनोरंजन झाले.’’ असं शेलार म्हणाले आहेत.
याशिवाय ‘’आधे इधर गए… आधे उधर गए.. अकेले “असरानी” बचगएं. आता महाराष्ट्रात “असरानी” जिथे जिथे फिरतील तिथे तुफान मनोरंजन होणार..! ’’ असंही शेलार यांनी सांगितलं आहे.
शिवसेना हा पक्ष माझ्या वडिलांनी म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केला आहे. तो निवडणूक आयोगाने स्थापन केला नाही. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह चोर गटाला दिले आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात केला. त्याचवेळी जनतेने जर आपल्याला सांगितले तर आपण एका मिनिटात घरी जाऊ. वर्षा बंगला सोडला तेव्हा देखील मी सत्तेला शिकून राहिलो नव्हतो. तसेच जर जनतेने सांगितले तर मी पुन्हा घरी जाईन पण हा फैसला मी निवडणूक आयोग भाजप अथवा चोर गटावर सोडणार नाही, असा स्पष्ट इशारा उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात दिला होता.
BJP leader Ashish Shelar responded to Uddhav Thackerays criticism in the Khead Rally
महत्वाच्या बातम्या
- मेघालयात NDAचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा, यूडीपीचा मुख्यमंत्री संगमा यांना लेखी पाठिंबा
- ठाकरे – शिंदे – भाजप भले भांडतील, पण बाळासाहेब ब्रँडच्याच नावाने मते मागतील!!; त्यांना काय पवार ब्रँडच्या नावाने मते मिळतील??
- ममतांवर टीका करणाऱ्या काँग्रेस प्रवक्त्याला अटक; केरळमध्ये एशिया नेट वर पोलिसांचे छापे; पण बीबीसी वरील छाप्यानंतर ओरडणारे लिबरल्स गप्प!!
- रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी फोडून उद्धव ठाकरे खेडच्या सभेत शिंदे – भाजप आणि निवडणूक आयोगावर बरसले!!