‘’इम्तियाज जलील यांच्या उपोषणाला समर्थन द्यायला उद्धव ठाकरे किंवा खैरे यांचे कोणी नेते पाठिंबा देण्यासाठी नाही गेले म्हणजे नशीब.’’ असंही म्हणाले आहेत.
प्रतिनिधी
भाजपा नेते आशिष शेलार यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क जिमखाना, दादर येथे पत्रकारपरिषदेत बोलताना उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि विरोधकांवर टीका केली. आशिष शेलार म्हणाले, ‘’मी या अगोदरही बोललो आहे की भ्रष्टाचाराची पुढची पायरी म्हणजे लांगुलचालन. या लांगुलचालनाच्या राजकारणाला उद्धव ठाकरेंचा जो काही उरलेला पक्ष आहे तो आता लागलेला आहे. मतांसाठी कुर्निसात करण्याचा धंदा त्यांनी सुरू केला आहे. म्हणून कधी मुस्लीम-मराठी, कधी मराठी-मुस्लीम हे शब्दप्रयोग करून कुठूनही आम्हाला विशिष्ट वर्गाची मतं मिळवायचीच आहेत. यासाठी कधी टिपू सुलतान नाव द्या, कधी तुर्भे येथील छत्रपती शिवाजी महाराज पूलाला विरोध करा. या सगळ्या पद्धतीचा धंदा यांनी सुरू केला आहे. महाराष्ट्रातील जनता यांना कधी माफ करणार नाही, समर्थन तर सोडूनच द्या.’’ BJP leader Ashish Shelar criticizes Uddhav Thackeray Sanjay Raut and the opposition
औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर झाल्याने एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज उपोषण सुरू केले आहे. यावर बोलताना आशिष शेलार म्हणाले, ‘’कोण इम्तियाज जलील त्याचा महाराष्ट्राच्या इतिहासाशी काय संबंध? छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाविषयी त्याला काय माहिती? या अशा बांडगुळांना आम्ही उत्तर देत नाही. पण माझी चिंता पुढची आहे, त्यांच्या उपोषणाला समर्थन द्यायला उद्धव ठाकरे किंवा खैरे यांचे कोणी नेते पाठिंबा देण्यासाठी नाही गेले म्हणजे नशीब.’’
याशिवाय राज्यातील बदलत्या राजकीय वातावरणाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आशिष शेलार यांनी ‘’बरोबर आहे वातावरण बदलत आहे, भाजपाला एकट्याला हरवायला सहा-सहा पक्षांना एकत्र यावं लागत आहे. एकट्या भाजपाला ते हरवू शकत नाही, सामना करू शकत नाही. अरे असेल हिंमत आणि उद्धव ठाकरेंच्या भाषेतच सांगायचं तर जर असेल मर्दांची पार्टी तर एकास एक भिडायला या.’’ असं विरोधकांना खुलं आव्हान दिलं.
याचबरोबर संजय राऊतांवर निशाणा साधताना आशिष शेलारांनी ‘’देवाच्या चरणी कोणी जावं कुणी नाही जावं, हे काय संजय राऊत ठरवणार आहेत का? जे स्वत: जेलमध्ये जाऊन आले आहेत. ज्यांनी स्वत: गोरेगावातील आमच्या मराठी बंधु-भगिनींचा पैसा लुबाडला आहे. ते ठरवणार का? अगोदर त्यांनी गंगेत डुबकी मारून यावं आणि मग बोलावं.’’ अशा शब्दांमध्ये टीका केली.
BJP leader Ashish Shelar criticizes Uddhav Thackeray Sanjay Raut and the opposition
महत्वाच्या बातम्या