Ashish Shelar Criticizes CM Uddhav Thackeray : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आजपासून पुन्हा एकदा सुरू झाली आहे. या यात्रेत भाजप नेते आशिष शेलारही सहभागी झाले आहेत. यात्रेवेळी उपस्थितांना संबोधित करताना शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला आहे. शेलार म्हणाले, ज्या लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाते, त्यांच्या पवित्र भूमीतून सांगतो, महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक उद्धव ठाकरे हे आहेत. BJP Leader Ashish Shelar Criticizes CM Uddhav Thackeray During Jan Ashirwad Yatra in Ratnagiri
विशेष प्रतिनिधी
रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आजपासून पुन्हा एकदा सुरू झाली आहे. या यात्रेत भाजप नेते आशिष शेलारही सहभागी झाले आहेत. यात्रेवेळी उपस्थितांना संबोधित करताना शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला आहे. शेलार म्हणाले, ज्या लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाते, त्यांच्या पवित्र भूमीतून सांगतो, महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक उद्धव ठाकरे हे आहेत.
आशिष शेलार म्हणाले की, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी सिंहगर्जना लोकमान्य टिळकांनी केली. त्याच महाराष्ट्रात आज मुख्यमंत्री फक्त माझं कुटुंब, माझी जबाबदारी हाच माझा जन्मसिद्ध हक्क आहे, या धोरणाने काम करीत आहेत. उद्धव ठाकरेंची शिवसेना कोकण विरोधी आहे. ज्यावेळी कोकणचे सुपुत्र नारायण राणे मुख्यमंत्री झाले त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी षडयंत्र केले.
शेलार पुढे म्हणाले की, सुरेश प्रभू यांनासुध्दा त्याकाळी अपमानास्पद वागणूक उद्धव ठाकरे यांनी दिली होती. बाकी रामदास कदम यांच्याही बाबतीत तेच झालं, अन्य नावे मी घेत नाही. आता राणे यांना केंद्रीय मंत्रिपद मिळाले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. कोकणाला काही मिळालं की उद्धव ठाकरे यांच्या पोटात का दुखतं? असा सवाल शेलार यांनी केला. उद्धव ठाकरेंविरोधात कोकणातील जनतेच्या मनात संताप आहे. येणाऱ्या काळात कोकणातील जनता हा संताप दाखवून देईल, असा इशाराही शेलार यांनी दिला.
BJP Leader Ashish Shelar Criticizes CM Uddhav Thackeray During Jan Ashirwad Yatra in Ratnagiri
महत्त्वाच्या बातम्या
- ओबीसींचं राजकीय आरक्षण परत मिळेपर्यंत निवडणुका घेऊ नका, अन्यथा ओबीसींची अपरिमित हानी, फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा
- तंत्रज्ञानाच्या प्रगतीतून भारत बनेल महासत्ता ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा पुण्यात दृढविश्वास
- कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे केंद्राने केरळ आणि महाराष्ट्र या दोन राज्यांना रात्रीच्या कर्फ्यूचा विचार करण्यास सांगितले
- जनताच कुंभकर्णासारखी झोपलीय ; मी ८४ वर्षांचा आहे.. मी कधीपर्यंत लढू ? अण्णा हजारे म्हणाले, शेतकरी आंदोलकांनी संपर्कच साधला नाही…
- रत्नागिरीत टिळक – सावरकरांच्या स्मृतींना अभिवादन करून नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचा दुसरा टप्पा सुरू