कोराडी पोलीस ठाणे परिसरात पटोले यांच्या विरोधातील आंदोलनात भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. BJP is aggressive against Nana Patole, calls for sit-in agitation; Chandrashekhar Bavankule was taken into police custody
विशेष प्रतिनिधी
नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचारात लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथे मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.पटोलेंविरोधात भाजप चांगलीच आक्रमक झाली .
दरम्यान पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजपने ठिय्या आंदोलन पुकारले. दरम्यान, कोराडी पोलीस ठाणे परिसरात पटोले यांच्या विरोधातील आंदोलनात भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नाना पटोले मोदींबाबत नेमक काय म्हणाले
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले लाखनी तालुक्यात म्हणाले की ‘मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो’ असं ते म्हणाले होते.
पटोलेंविरोधात तक्रारी दाखल
नागपुरात भाजप कार्यकर्ते कालपासून पटोलेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहे.आमदार चंद्रशेखर बावनकुळेंसह भाजप कार्यकर्त्यांनी जोपर्यंत पटोलेंवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून जाणार नसल्याची भूमिका घेतली होती. दरम्यान बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपने पोलीस ठाणे परिसरात ठिय्या आंदोलन सुरू केले होते. तर, आता पोलिसांनी बावनकुळे यांना ताब्यात घेतले आहे.
BJP is aggressive against Nana Patole, calls for sit-in agitation; Chandrashekhar Bavankule was taken into police custody
महत्त्वाच्या बातम्या
- १९९० च्या दशकात नऊ बालकांची हत्या करणाऱ्या गावित बहिणींची फाशीची शिक्षा रद्द , मुंबई हायकोर्टाने दिला निर्णय
- बोकडाचा बळी देण्याऐवजी ऐवजी माणसाच्या गळ्यावर सुरी चालविली; आंध्र प्रदेशातील धक्कादायक घटना; दारूच्या नशेत कृत्य
- एसटी बसेसचे स्टेअरिंग होमगार्डच्या हाती, राज्यभरात चार हजार जवान तयार ; जवानांकडे आहे अवजड वाहन चालवण्याचा परवाना