वृत्तसंस्था
मुंबई : काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर होत असलेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार रजनी पाटील यांच्या समोर भाजपने संजय उपाध्याय यांना उतरविले आहे. ते निवडून येण्यासाठी भाजपकडे फक्त 20 आमदारांची कमतरता आहे. ती आम्ही भरून काढू, असा आत्मविश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला आहे.BJP has less than 20 MLAs for Sanjay Upadhyay election, let’s fill it !!; Chandrakantdada’s faith
संजय उपाध्याय हे महान राम भक्तांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या वडिलांनी राम जन्मभूमीचे भूमिपूजन केले आहे. राम मंदिरासाठी देणगी देणारे ते पहिले गृहस्थ आहेत. त्यांच्या सुपुत्राला महाराष्ट्रातून निवडून आणण्यात भाजपला काही अडचण वाटत नाही. आमच्याकडे फक्त 20 आमदारांची कमतरता आहे, ती आम्ही भरून काढू!!, असा आत्मविश्वास चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला आहे.
काँग्रेसला भीती दगाफटक्याची
काँग्रेसचे नेते रजनी पाटील यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. परंतु संजय उपाध्याय यांनी आज अर्ज दाखल केल्यामुळे त्यांच्या मनसुब्यांना तितकाच जोरदार धक्का बसला आहे. त्यातही चंद्रकांतदादा पाटील यांनी फक्त 20 आमदारांची कमतरता आहे,
असा आकडाच सांगितल्याने महाविकास आघाडीत चलबिचल सुरू झाली आहे. काँग्रेसचे नेते धास्तावले आहेत. कारण ही जागा काँग्रेसच्या राजीव सातव यांचे होती. त्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन घटक पक्षांना काँग्रेसचाच पारड्यात ही जागा टाकावी लागली.
परंतु तरी देखील राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार एकगठ्ठा रजनी पाटील यांनाच मतदान करतीलच याची काँग्रेस जनांना शाश्वती नाही. त्यातही आधी रजनी पाटलांचे नाव राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत घातल्याने आणि नंतर काढल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची नाराजी काँग्रेसला सहन करावी लागण्याची शक्यता आहे.
अशा स्थितीत 20 आमदारांचा आकडा गाठणे भाजपला फार अवघड जावे अशी स्थिती नसण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भाजपने राजकीय चतुराई दाखवून संजय उपाध्याय यांना राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत उतरविल्याचे दिसून येत आहे.
BJP has less than 20 MLAs for Sanjay Upadhyay election, let’s fill it !!; Chandrakantdada’s faith
महत्त्वाच्या बातम्या
- विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांवर पुण्यात गुन्हा दाखल; लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकरांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य
- राज्यात अत्याचार थांबेनात : पुण्यात विवाहितेची सामूहिक बलात्कारानंतर हत्या, एका आरोपीला अटक, इतरांचा शोध सुरू
- आसाम सरकार आणि ULFA मध्ये चर्चा सुरू, केंद्रही शांतता चर्चेचा होणार सहभागी, मुख्यमंत्री सरमा यांचे प्रतिपादन
- Evergrande crisis : एका चिनी कंपनीमुळे जगभरातील 500 गर्भश्रीमंतांचे 135 बिलियन डॉलर्सचे नुकसान, भारताला का होणार फायदा?, वाचा सविस्तर…