वृत्तसंस्था
अकोला : कोरोनाच्या काळात सर्वत्र टाळेबंदी असताना महावितरणेने जनतेला अखंडित वीज पुरवठा केला. कोरोनामुळे काही जणांच्या रोजगारावर संकट आले. पण जर वीज वापरली असेल तर देयकाचे पैसे भरावेच लागेल,” असा इशारा वीज ग्राहकांना ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिला. bills will have to be paid for using electricity; Energy Minister Nitin Raut Warning
अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू, बार्शी टाकळी तालुक्यातील कोथळी आणि घोटा येथील वीज उपकेंद्राचे लोकार्पण राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
राज्यभरात शेतकऱ्यांचे वीजपुरवठा खंडित करण्यावरून तीव्र आंदोलने सुरू असताना ऊर्जामंत्री यांचे वक्तव्य हे आंदोलन करणाऱ्यांना स्पष्ट संदेश असल्याचे मानले जात आहे. यामुळे आंदोलक व राज्य सरकार यांच्यातील संघर्ष अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वाढण्याची शक्यता आहे.
”ग्राहक वीज देयकाची रक्कम भरणार नाहीत अशा वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल आणि हे करताना कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही ,असा स्पष्ट इशारा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिला.
bills will have to be paid for using electricity; Energy Minister Nitin Raut Warning
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा समाजाच्या जीवावर राजकारण करून त्यांचीच फसवणूक, मुख्यमंत्र्यांसह मराठा मंत्र्यांनी राजीनामे देण्याची राधाकृष्ण विखे-पाटील यांची मागणी
- शर्मीला ठाकरे म्हणतात, १५ वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी कानाखाली वाजवली म्हणून आज सर्वत्र मराठीचा वापर
- गाढ झोपून हा युवक मिळवितो लाखो रुपये, यू ट्यूबची कमाल
- Russia Ukraine War : रशिया यूक्रेनवर अणुबॉम्ब टाकणार? राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांनी यंत्रणेला केलं अलर्ट
- Kili Paul : किली पॉल-नीमा वर पंतप्रधान मोदी देखील फिदा ! त्यांच्या प्रतिभेचा आदर करत ‘मन की बात’मध्ये उल्लेख… म्हणाले भारतीय संगीताची जादू…