Deglaur market committee : येथील देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीत अशोक चव्हाण यांना जबरदस्त धक्का बसला आहे. येथे भाजपप्रणीत पॅनलने झेंडा फडकावला असून विरोधातील महाविकास आघाडी पॅनलचा सुपडासाफ झाला आहे. भाजप पॅनलचे सर्वच सर्व 18 उमेदवार विजयी झाले आहेत. Big shock to Ashok Chavan, BJPs one sided power over Deglaur market committee
प्रतिनिधी
नांदेड : येथील देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीत अशोक चव्हाण यांना जबरदस्त धक्का बसला आहे. येथे भाजपप्रणीत पॅनलने झेंडा फडकावला असून विरोधातील महाविकास आघाडी पॅनलचा सुपडासाफ झाला आहे. भाजप पॅनलचे सर्वच सर्व 18 उमेदवार विजयी झाले आहेत.
देगलूर बाजार समितीच्या निवडणुकीत आज झालेल्या मतमोजणीत हा निकाल आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाल्यापासून पहिल्यांदाच बाजार समितीवर भाजपचा झेंडा फडकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दोन महिन्यांपूर्वी झालेल्या देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत मोठी ताकद लावूनही, येथे भाजप उमेदवाराचा पराभव झाला आहे.
तथापि, भाजपने येथे बाजार समिती ताब्यात घेऊन तालुक्यात पक्षाला उभारी देण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. भाजपच्या या विजयामुळे काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांना मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Big shock to Ashok Chavan, BJPs one sided power over Deglaur market committee
महत्त्वाच्या बातम्या
- श्रीलंकेच्या नौदलाने ४३ भारतीय मच्छिमारांना केले अटक ; सहा बोटीही घेतल्या ताब्यात
- चार वर्षाखालील मुलांना डेक्स्ट्रोमेथोरफान सिरप देऊ नका; केंद्र सरकारचा आदेश
- मतदार कार्ड आधारशी जोडण्यास असदुद्दीन ओवैसींचा विरोध, म्हणाले- हे तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात!
- 12 खासदारांचे निलंबन : मुद्दा निकाली काढण्यासाठीचा सरकारचे बैठकीचे निमंत्रण, विरोधकांनी फेटाळले
- हिवाळी अधिवेशन : मतदार कार्ड आधारशी लिंक करण्याचे विधेयक आज लोकसभेत होणार सादर, निवडणूक सुधारणा विधेयकामुळे काय बदलणार? वाचा सविस्तर…