Monday, 5 May 2025
  • Download App
    मोठी बातमी : अखेर नितेश राणे यांना दिलासा, संतोष परब हल्लाप्रकरणी 30 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर राणेंना जामीन मंजूर । Big news Nitesh Rane finally consoled, bail granted to Rane on caste bond of Rs 30,000 in Santosh Parab attack case

    मोठी बातमी : अखेर नितेश राणे यांना दिलासा, संतोष परब हल्लाप्रकरणी 30 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर राणेंना जामीन मंजूर

    Big news Nitesh Rane finally consoled, bail granted to Rane on caste bond of Rs 30,000 in Santosh Parab attack case

    Nitesh Rane : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीदरम्यान शिवसेनेच्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अडचणीत आलेले आमदार नितेश राणे यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. सिंधुदुर्ग न्यायालयाने त्यांना 30 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला आहे. Big news Nitesh Rane finally consoled, bail granted to Rane on caste bond of Rs 30,000 in Santosh Parab attack case


    प्रतिनिधी

    सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीदरम्यान शिवसेनेच्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अडचणीत आलेले आमदार नितेश राणे यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. सिंधुदुर्ग न्यायालयाने त्यांना 30 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला आहे.

    मंगळवारी या प्रकरणावर सुनावणी पार पडली होती. त्यावर आज सिंधुदुर्ग न्यायालयाने निर्णय दिला आहे. आमदार नितेश राणे यांना 30 हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका झाली आहे. ते सध्या रुग्णालयातही उपचार घेत आहेत. जामीन मंजूर झाल्याने नितेश राणे यांना हा मोठा दिलासा मानला जात आहे. राणे यांनी थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत ही लढाई लढली होती. यानंतर कोर्टाच्या आदेशामुळे ते न्यायालयाला शरण आले होते. यानंतर त्यांच्यामार्फत नियमित जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. यावर आज सिंधुदुर्ग न्यायालयाने निकाल देत त्यांना दिलासा दिला आहे. तथापि, जामिनाच्या संपूर्ण अटी-शर्थी अजून समोर यायच्या आहेत. पण तरीही राणे कुटुंबीयांना हा मोठा दिलासा मानला जात आहे.

    केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांना खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणातून मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी, सर्वोच्च न्यायालयाकडून राणेंच्या अटकेला 10 दिवसांसाठी संरक्षण मिळाले होते. त्यांना ट्रायल कोर्टासमोर शरण येण्यास आणि पुढील 10 दिवसांत नियमित जामिनासाठी अर्ज करण्यास सांगण्यात आले होते.

    यापूर्वी १७ जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने राणेंच्या अटकेला २७ जानेवारीपर्यंत स्थगिती दिली होती. त्याचवेळी या प्रकरणातील दुसरा आरोपी मनीष दळवी याला उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

    यापूर्वी 13 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान महाराष्ट्र पोलिसांनी आमदार नितेश राणे यांचा खुनाचा प्रयत्न प्रकरणात सहभाग असल्याचे सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचा दावा उच्च न्यायालयात केला होता. अटकपूर्व जामीन फेटाळण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला राणे कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.

    राणेंना सूडबुद्धीने गोवण्यात आले

    सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान राणेंची बाजू मांडताना मुकुल रोहतगी यांनी राजकीय सूडबुद्धीने आपल्याला गोवण्यात आल्याचे सांगितले होते. त्याचवेळी नितेश राणे यांनी याप्रकरणी स्पष्टीकरण देताना ‘माझा या प्रकरणाशी अजिबात संबंध नाही. हे सर्व शिवसेनेतील अंतर्गत वादातून सुरू झाले आहे, असे म्हटले होते.

    सिंधुदुर्गात गुन्हा दाखल

    शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात नितेश राणे यांचा हात असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सिंधुदुर्गात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष परब यांचा आरोप आहे, ‘दुचाकीवरून जात असताना मला कारने जोरदार धडक दिली. टक्कर इतकी जोरदार होती की, मी रस्त्यावर पडलो. माझ्या हाताला खूप दुखापत झाली होती. मी पडलो होतो आणि माझी बाईक माझ्यावर पडली होती. धक्का देणारे वाहन सिल्वहर रंगाची इनोव्हा होती जी मला धडकल्यानंतर 20-25 फूट पुढे गेली. तेथून खाली उतरल्यानंतर एक व्यक्ती माझ्याजवळ आला आणि नितेश राणे आणि गोट्या सावंत यांची नावे घेऊन मला धमकावू लागला आणि माझ्या खिशातून मोबाईल काढून घेतला.

    Big news Nitesh Rane finally consoled, bail granted to Rane on caste bond of Rs 30,000 in Santosh Parab attack case

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Jammu Kashmir : लष्कराचे वाहन ७०० फूट खोल दरीत कोसळले; ३ जवानांचा मृत्यू

    Igla S missile : भारतीय लष्कराला रशियन बनावटीचे इग्ला-एस क्षेपणास्त्र मिळाले

    Manoj Tiwari : मनोज तिवारी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला!