Oxygen Express Trains : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा एकदा देशात रुग्णसंख्येचे उच्चांक प्रस्थापित होत आहेत. यादरम्यान गंभीर रुग्णांची संख्याही प्रचंड वाढली आहे. यामुळे साहजिकच ऑक्सिजनची मागणीही वाढली आहे. पंतप्रधान मोदींनी नुकतीच या परिस्थितीवर बैठक घेतली होती. परिणामी, आता भारतीय रेल्वे ऑक्सिजन एक्स्प्रेस ट्रेन (Oxygen Express Trains) चालवणार आहे. रेल्वे लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (LMO) आणि ऑक्सिजन सिलिंडरच्या वाहतुकीसाठी सज्ज झाली आहे. ऑक्सिजन एक्स्प्रेस रेल्वेच्या वेगवान दळणवळणासाठी स्पेशल ग्रीन कॉरिडोरही तयार केला जात आहे. big news Indian Railways now run Oxygen Express Trains, creating green corridors to provide faster supply
विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा एकदा देशात रुग्णसंख्येचे उच्चांक प्रस्थापित होत आहेत. यादरम्यान गंभीर रुग्णांची संख्याही प्रचंड वाढली आहे. यामुळे साहजिकच ऑक्सिजनची मागणीही वाढली आहे. पंतप्रधान मोदींनी नुकतीच या परिस्थितीवर बैठक घेतली होती. परिणामी, आता भारतीय रेल्वे ऑक्सिजन एक्स्प्रेस ट्रेन (Oxygen Express Trains) चालवणार आहे. रेल्वे लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (LMO) आणि ऑक्सिजन सिलिंडरच्या वाहतुकीसाठी सज्ज झाली आहे. ऑक्सिजन एक्स्प्रेस रेल्वेच्या वेगवान दळणवळणासाठी स्पेशल ग्रीन कॉरिडोरही तयार केला जात आहे.
ऑक्सिजन एक्स्प्रेस ट्रेनचे तांत्रिक परीक्षण पूर्ण झाल्यावर रिकाम्या टँकर्सना महाराष्ट्राच्या रेल्वे स्थानकाहून विजाग, जमशेदपूर, राउरकेला, बोकारो इत्यादी ठिकाणी पाठवण्यात येणार आहे. येथे या रिकाम्या टँकर्समध्ये लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन भरण्यात येईल. यानंतर ऑक्सिजन एक्स्प्रेस ट्रेनमध्ये या टँकर्सना जोडून विविध ठिकाणी रवाना करण्यात येईल.
मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र शासनाने रेल्वेशी संपर्क करून लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (LMO) टँकर्सची रेल्वेद्वारे वाहतूक करण्याची मागणी केली होती.
यानंतर रेल्वेने ताबडतोब लिक्विड मेडिकल ऑक्सिजनच्या वाहतुकीचे तांत्रिक परीक्षण केले. अनेक चाचण्यांनंतर काही महत्त्वाच्या दिशानिर्देशांसोबत रेल्वेने लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आणि ऑक्सिजन सिलिंडरच्या वाहतुकीला मंजुरी दिली आहे.
रेल्वेच्या एक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे की, ऑक्सिजन टँकर्सच्या वाहतुकीचे काम महाराष्ट्राच्या वाहतूक आयुक्तांद्वारे केले जाईल. लिक्विडि मेडिकल ऑक्सिजन भरण्यासाठी रिकामे टँकर्सना मुंबईच्या जवळील कळंबोली, बोईसर आदी रेल्वे स्थानकांतून विजाग आणि जमशेदपूर, राउरकेला, बोकारो येथे पाठवण्यात येईल. तेथून ऑक्सिजनच्या वेगवेगळ्या राज्यांत पुरवठा होणार आहे.
याचाच अर्थ आता देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये रेल्वेच्या माध्यमातून लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा बिनदिक्कत पुरवठा होणार आहे. रेल्वेने हा निर्णय महाराष्ट्र, मध्य प्रदेश सरकारच्या विनंतीनंतर घेतला आहे.
big news Indian Railways now run Oxygen Express Trains, creating green corridors to provide faster supply
महत्त्वाच्या बातम्या
- Manmohan Singh Letter To PM Modi : कोरोनाला कसे हरवायचे? मनमोहन सिंगांनी पीएम मोदींना पत्र लिहून दिल्या 5 सूचना, वाचा सविस्तर…
- राहुल गांधींनी सभा रद्द करण्याचे कारण कोरोना की आणखी काही? वाढत्या कोरोना संकटासाठी एकच पक्ष जबाबदार कसा?
- ऑक्सिजन उत्पादन, रेमडेसिवीर उत्पादनवाढ यासाठी केंद्राचे युध्दपातळीवर प्रयत्न;१६२ ऑक्सिजन उत्पादन केंद्रांना मंजूरी, रेमडेसिवीर उत्पादन १५ दिवसांत डबल
- कोरोनामुळे जीवन संथ, सर्वत्र वेटिंगचा अनुभव ; एका क्लिकवर जग हातात असणाऱ्यांची पंचाईत
- कोरोनाचा प्रकोप पाहता राहुल गांधींनी बंगालमधील रॅलीज रद्द केल्या… पण होत्या तरी किती…??