CTET The second paper of 16th December canceled : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आजपासून सुरू झाली आहे. सीटीईटीचे पेपर १ आणि पेपर २ अशा दोन्ही परीक्षा ऑनलाइन स्वरूपात आजपासून सुरू झाल्या आहेत. ही परीक्षा दि. 16 डिसेंबर ते 13 जानेवारीपर्यंत दररोज दोन शिफ्टमध्ये आयोजित करण्यात आली आहे. मात्र, आज पहिल्याच दिवशी सकाळी पेपर १ व्यवस्थित झाल्यानंतर दुपारच्या शिफ्टमध्ये पेपर २ साठी तांत्रिक अडचणींचा हवाला देत परीक्षा रद्द करण्यात आली आहे. Big news CTET The second paper of 16th December canceled Due to server down
प्रतिनिधी
औरंगाबाद : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आजपासून सुरू झाली आहे. सीटीईटीचे पेपर १ आणि पेपर २ अशा दोन्ही परीक्षा ऑनलाइन स्वरूपात आजपासून सुरू झाल्या आहेत. ही परीक्षा दि. 16 डिसेंबर ते 13 जानेवारीपर्यंत दररोज दोन शिफ्टमध्ये आयोजित करण्यात आली आहे. मात्र, आज पहिल्याच दिवशी सकाळी पेपर १ व्यवस्थित झाल्यानंतर दुपारच्या शिफ्टमध्ये पेपर २ साठी तांत्रिक अडचणींचा हवाला देत परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तथापि, पेपरफुटीचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दुसऱ्या शिफ्टसाठीही परीक्षार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचले होते. विद्यार्थ्यांना केंद्रावर नियमित तपासणी करून प्रवेशही देण्यात आला. परंतु 2.30 वाजूनही परीक्षा काही सुरू झाली नाही. सुमारे तास-दीड तास विद्यार्थ्यांना बसवून ठेवल्यानंतर दुसऱ्या पेपरची परीक्षा रद्द करण्यात आल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना यासाठी तांत्रिक अडचणींचे कारण सांगण्यात आले. सर्व्हर डाऊन असल्याने परीक्षा होऊ शकत नाही, असे सांगण्यात आले. दरम्यान, दुसऱ्या शिफ्टचा पेपर देशभरात बहुतांश ठिकाणी रद्द झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. याबाबत परीक्षा केंद्रांबाहेर परीक्षा पुढे ढकलल्याची नोटीस डकवण्यात आली आहे.
अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर गोंधळ घातल्याचे समोर आले आहे. परीक्षांच्या आयोजनात वारंवार अडथळे येत असल्याचे दिसून आले आहे. मागच्या काही काळात यूपी टीईटी, राज्यातील म्हाडा तसेच राज्याची टीईटी परीक्षाही अशीच पुढे ढकलण्यात आली होती. वारंवार होणाऱ्या या विलंबामुळे विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, आज रद्द झालेला पेपर २ पुन्हा केव्हा होणार, याबाबत सीटीईटीकडून अद्याप स्पष्टीकरण आलेले नाही. परंतु १३ जानेवारीपर्यंत इतर विद्यार्थ्यांचीही परीक्षा होणार आहे, यासाठी परीक्षा केंद्रही बुक आहेत. यामुळे आज रद्द झालेल्यांचे पेपर १३ जानेवारीनंतरच होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी सीटीईटीचे अधिकृत संकेतस्थळ पाहावे, अशा सूचना देण्यात येत आहेत.
Big news CTET The second paper of 16th December canceled Due to server down
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : राज्यात बैलगाड शर्यतीला सशर्त परवानगी, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
- Bank Strike : आज आणि उद्या बँक कर्मचाऱ्यांचा संप, बँकांशी संबंधित कामांमध्ये होईल अडचण
- यूपीत प्रियांका कसे आणणार महिलाराज??; काँग्रेसच्या उमेदवारीकडेच महिलांनी फिरवली पाठ!!
- आमदार जोमात, सर्वसामान्य कोमात : आलिशान गाड्यांसाठी आमदारांना 30 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्जाची घोषणा, सर्वसामान्य मात्र 8.50 टक्के व्याजदराने बेहाल
- धक्कादायक : शीना बोरा जिवंत असल्याचा इंद्राणी मुखर्जीचा दावा, काश्मीरमध्ये शीनाचा शोध घेण्याची इंद्राणीची सीबीआयला पत्र लिहून मागणी