वृत्तसंस्था
नागपूर : वेगवेगळ्या मांगण्यासाठी राज्यातील शासकीय वीज कंपन्यांमध्ये कार्यरत अभियंते,तंत्रज्ञ, कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी व कामगारांनी संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे राज्यावर लोडशेडिंगचे मोठे संकट येऊन उभे ठाकले आहे. Big crisis of load shedding in the state? : Power strike likely to result
कोल इंडियाच्या युनियन दोन दिवसांच्या संपावर गेल्याने कोळसा पुरवठा पूर्णपणे ठप्प राहणार आहे. त्यामुळे लोडशेडिंग करावी लागण्याची शक्यता आहे. राज्यातील शासकीय वीज कंपन्यांमध्ये कार्यरत कर्मचारी व कामगार दोन दिवसीय म्हणजे २८ आणि २९ मार्च रोजी संपावर गेले आहे. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी या संपाचा फटका बसण्याची शक्यता आहे. या संपात कोल इंडियाच्या युनियन दोन दिवसांच्या संपावर गेली आहे. त्यामुळे दोन दिवस कोळसा पुरवठा पूर्णपणे ठप्प राहणार आहे. या संपामुळे देशपातळीवर वीजनिर्मिती प्रभावित होणार आहे.
नाशिक व भुसावळ येथील वीज निर्मिती ठप्प होण्याची शक्यता आहे. तसंच, कोराडी, खापरखेडा व चंद्रपूरचे वीज निर्मिती संच देखील प्रभावित होणार आहे. त्यामुळे राज्यात ४८ तासानंतर लोडशेडिंगची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सरकारने केला मेस्मा कायदा लागू दरम्यान, वीज कर्मचाऱ्यांच्या संपावर जाण्याचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने वीज कंपन्यांच्या अधिकारी-कर्मचारी या सर्वांना महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षा अर्थात मेस्मा कायदा लागू केला असून हा प्रस्तावित संप करण्यास मनाई केली आहे.
Big crisis of load shedding in the state? : Power strike likely to result
महत्त्वाच्या बातम्या
- ७ राज्यांमध्ये पेट्रोल शंभरच्या वर; आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ
- देशातील १० राज्यांत हिंदूच अल्पंसख्यांक, केंद्र सरकाची अल्पसंख्यांकांचा दर्जा शिफारस
- President Mayawati?? : मायावतींना राष्ट्रपतीपदाची ऑफर??; मायावतींनीच फेटाळली शक्यता!!
- Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना बख्तियारपूरमध्ये मारहाण; युवक पोलिसांच्या ताब्यात
- एसटी कर्मचाऱ्यांपाठोपाठ महाराष्ट्रातील वीज कर्मचारी भडकले; आज मध्यरात्रीपासून संपावर!!
- महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी पारा 40 अंश सेल्सिअसवर