या आगीत कंपनीचं मोठं नुकसान झालं आहे.मात्र सुदैवाने कुणीही जखमी झालेले नाहीत. मात्र आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.Big Basket godown fire in Pune; Destroy vegetables and groceries, fortunately there is no loss of life
विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील कोथरुड परिसरातील बिग बास्केट कंपनीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. यात गोडाऊनचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.सोमवारी रात्री साडेअकरा वाजता बावधान बुद्रुक येथील बिग बास्केटच्या गोडाऊनला आग लागली.
याआगीमध्ये धान्य, भाजीपाला, किराणा सामान जळून खाक झालं आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामनदलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आग नियंत्रणात आणली आहे.अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. या आगीत कंपनीचं मोठं नुकसान झालं आहे.मात्र सुदैवाने कुणीही जखमी झालेले नाहीत. मात्र आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील बावधन परिसरातील बिग बास्केट कंपनीच्या गोडाऊनला ही आग लागली आहे. रात्री साडे अकराच्या सुमारास ही आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, अग्निशमन दलाच्या जवानांना जवळपास साडे तीन तासांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र आगीत बिग बास्केट कंपनीचं संपूर्ण गोडाऊन जळून खाक झालं आहे.
बिग बास्केट कंपनीकडून जवळपास पाच किलो मीटर परिसरात अनेक दुकानांमध्ये भाजीपाला, किराणा माल आणि इतर साहित्याचा पुरवठा केला जातो. मात्र आगीत सर्व साहित्य जळून खाकं झालं आहे. त्यामुळे कंपनीचं मोठं नुकसान झाल आहे.
Big Basket godown fire in Pune; Destroy vegetables and groceries, fortunately there is no loss of life
महत्त्वाच्या बातम्या
- अर्शद मदनींकडून मोहन भागवतांच्या वक्तव्याचे समर्थन, हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच, आरएसएस प्रमुख चुकीचे बोलले नाहीत, संघ आता योग्य मार्गावर
- ओबीसी राजकीय आरक्षण; ठाकरे – पवार सरकारला तिसऱ्यांदा सर्वपक्षीय बैठक बोलविणे का भाग पडले…??
- शिवशाहीरांनी जागविल्या स्वातंत्र्यवीरांच्या तेजस्वी आठवणी…!!; विक्रम संपत यांच्या सावरकर चरित्राच्या पहिल्या भागाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन
- कोयना धरणाचे दरवाजे दुसऱ्यांदा उघडले, सहा वक्री दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरु