Friday, 2 May 2025
  • Download App
    शिवसेना सोडली नसती तर भुजबळ कधीच मुख्यमंत्री झाले असते!!; पवारांसमोर ठाकरेंचे टोलेBhujbal would never have become Chief Minister if he had not left Shiv Sena!!; Thackeray gangs in front of Pawar

    शिवसेना सोडली नसती तर भुजबळ कधीच मुख्यमंत्री झाले असते; पवारांसमोर ठाकरेंचे टोले

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या अमृत महोत्सवी सत्कार निमित्त मुंबईच्या ष्णमुखानंद हॉलमध्ये राजकीय टोलेबाजी बघायला मिळाली. छगन भुजबळांनी शिवसेना सोडली नसती, तर ते कधीच मुख्यमंत्री झाले असते, असा टोला माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत भुजबळांना लगावला. अर्थात भुजबळांच्या राजकीय कारकीर्दीचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख देखील केला.Bhujbal would never have become Chief Minister if he had not left Shiv Sena!!; Thackeray gangs in front of Pawar

    शरद पवारांनी आपल्या भुजबळांच्या सत्काराच्या छोटेखानी भाषणात शिवसेनेचा जरूर उल्लेख केला, पण बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख टाळला. छगन भुजबळांच्या दोन-तीन आठवणी पवारांनी आपल्या भाषणात सांगितल्या. मात्र आजच्या सत्कार समारंभात उद्धव ठाकरे यांच्याच वक्तव्याची जास्त चर्चा रंगली, ती म्हणजे छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली नसती तर ते कधीच मुख्यमंत्री झाले असते असे उद्धव ठाकरे म्हणाल्याने भुजबळांच्या राजकीय जखमेवरील खपलीच निघाली!!

    छगन भुजबळांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत नगरसेवक, मुंबईचे महापौर, आमदार, विरोधी पक्षनेते, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ही सगळी पदे भूषवली. पण वयाची 75 ओलांडली तरी त्यांना महाराष्ट्राचे अद्याप मुख्यमंत्री होता आलेले नाही.
    माझी उपमुख्यमंत्री माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी 1999 मध्ये भुजबळ यांना मुख्यमंत्री होण्याची संधी आली होती मिळाली असती असा उल्लेख केला, तो धागा पकडून उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली नसती तर ते त्या आधीच मुख्यमंत्री झाले असते असे वक्तव्य केले आणि ते देखील शरद पवार यांच्या उपस्थितीत केले. त्यामुळे या वक्तव्याला विशेष महत्त्व आहे.

    1992 भुजबळांची बंडखोरी आणि पवार

    1992 मध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेनेत बंडखोरी करून 18 आमदार फोडले होते. या 18 आमदार फोडण्यामागे त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांचीच राजकीय करामत होती हे उघड गुपीत होते. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी छगन भुजबळांच्या 75 निमित्त केलेल्या सत्कार समारंभात ऑनलाईन उपस्थिती लावून भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर ते कधीच मुख्यमंत्री झाले असते, असे वक्तव्य करणे ही भुजबळांच्या राजकीय जखमेवरील खपली काढण्याबरोबरच पवारांनी शिवसेना फोडली होती याची आठवण करून दिली. त्याचबरोबर पवारांनी भुजबळांना मुख्यमंत्री केले नाही हे देखील उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून अधोरेखित करून घेतले.

    Bhujbal would never have become Chief Minister if he had not left Shiv Sena!!; Thackeray gangs in front of Pawar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पाकवर कडक कारवाई करणारे मोदी पहिले पंतप्रधान!

    Prakash Ambedkar भाजप पासून सावध राहायचा शिंदे + अजितदादांना प्रकाश आंबेडकरांचा सल्ला; पण खुद्द त्यांच्या वंचित आघाडीची अवस्था काय??

    फडणवीस सरकारने स्वतःच घेतलेल्या परीक्षेत सरकार 78 % गुण मिळवून पास; पण काही विभागांमध्ये नापास!!