• Download App
    भिवंडी : बंद कपड्याच्या कंपनीला आग, अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल । bhiwandi-fire-brigade-fires-three-vehicles-of-fire-brigade

    भिवंडी : बंद कपड्याच्या कंपनीला आग, अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल

    कारखान्याच्या आजूबाजूला सुमारे ४० ते ५० रहिवाशी घरे आहेत.आग लागतच रहिवासी परिसरात एकच खळबळ उडाली होती. Bhiwandi: Fire brigade fires three vehicles of fire brigade


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : भिवंडीत आज पहाटेच्या सुमारास शहरातील काजी कंपाऊंड परिसरामध्ये असलेल्या एका यंत्रमाग कारखान्याला भीषण आग लागली आहे.घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या.दरम्यान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणखी २ तास लागले.

    आगीचे कारण अद्यापही समोर आले नसून आतापर्यत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहेया कारखान्यात कपड्यांचा मोठ्या प्रमाणात साठा साठवून ठेवण्यात आला आहे. तर, कारखान्याच्या आजूबाजूला सुमारे ४० ते ५० रहिवाशी घरे आहेत.आग लागतच रहिवासी परिसरात एकच खळबळ उडाली होती.



    ही आग एवढी भीषण होती की कारखानाच्या छताचे पत्रे तुटून हवेत उडत होते.त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान, खबदारीचा उपाय म्हणून परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.

    Bhiwandi : Fire brigade fires three vehicles of fire brigade

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ॲडव्हांटेज विदर्भ 2026 मध्ये इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्हचे उद्घाटन; 22 देशांचे राजदूत, वाणिज्यदूतांची उपस्थिती

    ठाकरेंना वगळून मुंबईत भाजपचा मराठीचा ठसा, अजितदादा गेल्यानंतर भाजपच्या हातात राष्ट्रवादीच्या नाड्या!!

    पवार कुटुंबातील घडामोडी आणि राष्ट्रवादीतील घडामोडींपासून सुप्रिया सुळे “दूर”; वाढले “गूढ”!!