महत्वाची बाब म्हणजे या आंदोलनात भीक मागून जमा झालेली रक्कम एसटी कर्मचारी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करणार आहेत.’Bhik Mango’ agitation with family of ST employees in Jalgaon
विशेष प्रतिनिधी
जळगाव : गेल्या अडीच महिन्यांपासून पुकारलेल्या एसटी संपाचा तिढा काही संपायचं नाव घेईना.शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला होता.परंतु विलीनीकरणाची मागणी मान्य होत नसल्यानं अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली तर काहींनी आंदोलन पुकारलं.दरम्यान सध्या जळगावमध्ये एसटी कर्माचारी आणि त्यांच्या कुटुंबाचं ‘भीक मांगो’ आंदोलन सुरु आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे. एसटीच्या विभागीय कार्यालयापासून एसटी स्टँडपर्यंत भीक मागून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.दरम्यान महत्वाची बाब म्हणजे या आंदोलनात भीक मागून जमा झालेली रक्कम एसटी कर्मचारी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करणार आहेत.म्हणून आता सरकार यावर काय पाऊल उचलणार याकडे लक्ष लागलं आहे.
‘Bhik Mango’ agitation with family of ST employees in Jalgaon
महत्त्वाच्या बातम्या
- Corona Updates : देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 2 लाख 86 हजार रुग्णांची नोंद, कालच्या तुलनेत 11.7 टक्के अधिक
- WATCH : प्रजासत्ताक दिन अटारी-वाघा सीमेवरही साजरा, बीएसएफ-पाक रेंजर्सच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांना दिली मिठाई
- Padma Awards 2022 : २०२२ चे पद्म पुरस्कार जाहीर, ‘ हे’ आहेत मानकरी ; वाचा सविस्तर
- राष्ट्रपतींच्या सुरक्षा घोडदळातील ‘विराट’ला निरोप; पंतप्रधान, संरक्षणमंत्री यांनी फिरविला प्रेमाने हात