प्रतिनिधी
नाशिक : राज्यभरातील मंदिरे उघडणे आणि दहीहंडी उत्सवाच्या परवानगी देणे या मागण्यांसाठी भाजप आणि मनसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेरले आहे. Bharatiya Janata Party holds protest demanding reopening of temples in Maharashtra
उद्धव ठाकरे हे सत्तेवर आल्यापासून हिंदू शब्दच विसरले आहेत. हिंदू सण जवळ आले की त्यांना कोरोन आठवतो. इतर वेळी कोरोना ते कुलूप बंद करून ठेवतात, अशा शेलक्या शब्दात मनसेने उद्धव ठाकरे यांना यांच्यावर तोफ डागली आहे.
तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी ठाकरे – पवार सरकारच्या काळात दारूचे बार उघडे आणि मंदिरे बंद आहेत. हिंदू समाजाने देवदर्शनासाठी काय मातोश्रीवर जायचे काय?, असा रोकडा सवाल केला आहे.
मंदिरे उघडण्यासाठी आणि दहीहंडीचीचा सण साजरा करण्यासाठी भाजप आणि मनसे राज्यभरात आंदोलन करीत आहेत. चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले, तर ठाण्यात भगवती मैदानावर मनसे नेते अविनाश जाधव दहीहंडी उत्सवाला परवानगी देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. या मैदानावर दरवर्षी मनसे मोठ्या प्रमाणावर दहीहंडी उत्सव साजरा करते.
शिवसेनेने मात्र आपण सत्तेवर असल्याचे लक्षात घेऊन स्वतःच्या पक्षाचे सर्व दहीहंडी उत्सव अधिकृत पातळीवर रद्द केले आहेत. मनसे मात्र दहीहंडी उत्सव करण्यावर ठाम असून ठाकरे – पवार सरकारने परवानगी दिली, तर ठीक अन्यथा सरकारचे आदेश मोडून दहीहंडी उत्सव साजरा करणार असल्याचे मनसे नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
नाशिकमध्ये भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांच्या नेतृत्वाखाली काळाराम मंदिरासमोर शेकडो कार्यकर्त्यांनी मंदिर उघडण्यासाठी आंदोलन केले.
आज जन्माष्टमी आहे. या पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या आंदोलनांना कार्यकर्त्यांचा आणि लोकांचा जोरदार पाठिंबा मिळाला आहे.
Bharatiya Janata Party holds protest demanding reopening of temples in Maharashtra
महत्त्वाच्या बातम्या
- लाईफ स्किल : कष्टाला संयमाचाही जोड द्या, यशाच्या मार्गावर चालताना सावधगिरी बाळगा
- काबूल विमानतळाजवळ क्षेपणास्त्रे उडाली, हवाई संरक्षण यंत्रणेने हल्ला केला अयशस्वी
- तिसरी लाट थोपविण्यासाठी दीड लाख आयसीयू बेड तयार ठेवा , निती आयोगाची सूचना
- मुबंईकरांसाठी खूषखबर, कोरोनाचा आलेख वेगाने लागला घसरू, पॉझिटीव्हीटी दर अवघा एक टक्यादहशतवर