• Download App
    'भारत गौरव' ट्रेन सुरू होणार , देशातील पर्यटनाला मिळणार चालना ; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली घोषणा'Bharat Gaurav' train to be launched, tourism in the country will get a boost; Railway Minister Ashwini Vaishnav made the announcement

    ‘भारत गौरव’ ट्रेन सुरू होणार , खासगी सेवेतून ट्रेन चालवण्यात येतील,देशातील पर्यटनाला मिळणार चालना ; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली घोषणा

    देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून महत्त्वाची पावले उचलण्यात येत आहेत. खासगी सेवेतून ट्रेन चालवण्यात येतील.’Bharat Gaurav’ train to be launched, tourism in the country will get a boost; Railway Minister Ashwini Vaishnav made the announcement


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी मंगळवारी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारत गौरव ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. देशात सध्या १८० भारत गौरव ट्रेन चालवण्याची योजना आहे. यामध्ये तीन हजारहून अधिक कोचेस असतील. रेल्वेनं यासाठीची अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. त्याला अतिशय उत्तम प्रतिसादही मिळत आहे.तसेच यासाठी अर्ज घेण्यासही सुरुवात झाली आहे.



    भारत गौरव ट्रेनच्या सेवेचे नियंत्रण खासगी आणि आयआरसीटीसीद्वारे करण्यात येणार आहे. देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून महत्त्वाची पावले उचलण्यात येत आहेत. खासगी सेवेतून ट्रेन चालवण्यात येतील. तर देखरेख, पार्किंग आणि इतर सुविधांसाठी आयआरसीटीसी मदत करणर आहे, ही नियमित रेल्वे सेवा नसून हा वेगळा प्रयोग असल्याचे वैष्ण यांनी सांगितले.

    तसेच यामध्ये एसी, नॉन एसी अशा सर्व प्रकारच्या गाड्यांचा समावेश असेल. याशिवाय मार्ग ठरवण्याचे अधिकार कंपनीला असतील. भारत गौरव ट्रेन खाजगी क्षेत्र आणि IRCTC दोन्हीद्वारे चालवली जाऊ शकते. या गाड्यांचे भाडे टूर ऑपरेटर ठरवेल.

    ‘Bharat Gaurav’ train to be launched, tourism in the country will get a boost; Railway Minister Ashwini Vaishnav made the announcement

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस