• Download App
    नेमाडेंची मुक्ताफळे; औरंगजेबाच्या दोन राण्या काशीच्या पंड्यांनी केल्या भ्रष्ट; शिवाजी महाराजांचा मुख्य सरदार मुसलमान, तर औरंगजेबाचा हिंदू!! Bhalchandra nemade hindu history in Mumbai marathi Grantha sanghralay

    नेमाडेंची मुक्ताफळे; औरंगजेबाच्या दोन राण्या काशीच्या पंड्यांनी केल्या भ्रष्ट; शिवाजी महाराजांचा मुख्य सरदार मुसलमान, तर औरंगजेबाचा हिंदू!!

    प्रतिनिधी

    मुंबई : मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय तर्फे मुंबईतील दादरमध्ये शतकोत्तर रौप्य महोत्सवी सांगता समारंभात ज्ञानपीठ पारितोषिक विजेते भालचंद्र नेमाडे यांनी एकापाठोपाठ एक मुक्ताफळे उधळली. काशीच्या पंड्यांनी औरंगजेबाच्या दोन राण्या भ्रष्ट केल्या म्हणून ज्ञानवापीची मोडतोड झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा मुख्य सेनापती मुसलमान होता, तर औरंगजेबाचा मुख्य सेनापती हिंदू होता, असा जावई शोध देखील भालचंद्र नेमाडे यांनी लावला. Bhalchandra nemade hindu history in Mumbai marathi Grantha sanghralay

    इतकेच नाहीतर तरुण पिढीला पुस्तके वाचून हा खरा इतिहास समजेल असा दावाही त्यांनी केला. भालचंद्र नेमाडे ज्या मुंबई मराठी संग्रहालयात भाषण करत होते, तिथे कार्यक्रमाला मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक अशोक वाजपेयी उपस्थित होते.

    या कार्यक्रमात भालचंद्र नेमाडे यांनी एकापाठोपाठ एक वादग्रस्त वक्तव्ये केली. खरेतर ते पुस्तकांच्या वाचनाचे महत्त्व समजावून सांगत होते. पण त्यावेळी ते इतिहासातल्या काही घटनांवर घसरले.

    औरंगजेब आणि शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल नेमाडेंनी जे भाषणात सांगितले, तो इतिहास त्यांनी कुठल्या पुस्तकात वाचला त्या पुस्तकाचे नाव मात्र नेमाडे यांनी सांगितले नाही.



    भालचंद्र नेमाडे म्हणाले :

    मी ज्यावेळी पुस्तकं वाचली, त्यावेळी माझ्या लक्षात आलं की, दुसऱ्या बाजीराव बाबत जी माहिती सांगितली जात आहे, ती चुकीची आहे. त्याने पेशवाई पेशव्यांच्या तावडीतून सोडवून इंग्रजांच्या ताब्यात दिली हे चांगले झाले. कारण पेशवे क्रूर होते, पण इंग्रज त्यांच्यापेक्षा कमी क्रूर होते.

    औंरगजेबाचा दोन राण्या होत्या. त्या काशीविश्वेश्वराला गेल्या होत्या. त्यावेळी तिथं असलेल्या पंड्यांनी राण्यांना भ्रष्ट केले. त्यानंतर तिथे जी मोडतोड औरंगजेबाने केली त्याला ज्ञानव्यापी म्हणून आता ओळखल जाते.

    शिवाजी महाराजांचा मुख्य सरदार मुसलमान होता, औरंगजेबाचा मुख्य सरदार जयसिंग हिंदू होता.

    औरंगजेबाच्या काळात निम्म्यापेक्षा जास्त हिंदू सरदार होते. सती प्रथा बंद करणारा पहिला औरंगजेब होता. सध्या रोज बातम्या येतात, बायका भ्रष्ट केल्याच्या. 300 – 350 लहान मुली पळवून नेल्या. सध्या इथे राहायचं कसं? हा प्रश्न आहे.

    सध्या बाहेर जे चाललंय ते सगळं खोटं चाललंय त्यामुळे तरुणांनी पुस्तकं वाचून खरे काय ते समजून घ्यावे

    तुम्ही ग्रंथ पुस्तके वाचली तर तुम्हाला सत्य समजेल, म्हणून ते वाचायला हवे. कुणाचे काही ऐकू नका, तर वाचा. तुम्ही पुस्तके वाचली की कोण खरे बोलते? कोण खोटे बोलते? हे कळते.

    शरद पवार काय म्हणाले?

    यावेळी शरद पवार यांनीदेखील भाषण केलं. “आजचा दिवस मुंबई मराठी ग्रंथ संग्रहलयासाठी महत्वाचा दिवस आहे. ही संस्था उभी करताना 10-11 लोक एकत्र आले आणि हे संग्रहालय उभं केलं. कुठलाही देश समृद्ध कसा झाला याचा विचार करतो, माझ्या मते समृद्धी याचं मोजमाप करायचं असेल तर वाचन संस्कृती महत्वाची आहे. अनेक गोष्टी आहेत ज्या सांगता येतील. उत्तम प्रकारचे ग्रंथ या संस्थेत आहेत, असं शरद पवार आपल्या भाषणात म्हणाले.

    125 वर्ष ही संस्था काम करत आहे. 10-11 लोक एकत्र आले आणि पैसे जमा करून आज ही संस्था उभी राहिली. समृद्धीची मोजमाप करायचं असेल तर सोने नाने नव्हे तर त्या संस्थेची सांस्कृतिक पातळी किती उंच आहे हे पाहावे, असे पवार म्हणाले.

    नांदेड जिल्ह्यात सेलू नावाचे गाव आहे तिथं असलेल्या कॉलेज मधील लेखनाची उंची पुण्यापेक्षा चांगली आहे. यशवंतराव चव्हाण यांना एकच आवड होती ती म्हणजे वाचन आणि ग्रंथ. ते जगात कुठेही गेले तर कामे संपल्यावर ग्रंथ खरेदीच करत असत. त्यांनी माझ्यावर एक जबाबदारी दिली होती. त्यांच्या पुस्तकांचे ग्रंथालय करावे. ते गेले त्यावेळी त्यांच्याकडे केवळ 86000 हजार रूपये होते. मात्र ग्रंथांची संख्या 28000 हजार होती, याची आठवण शरद पवार यांनी काढली.

    Bhalchandra nemade hindu history in Mumbai marathi Grantha sanghralay

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    अमेरिकेचे उपाध्यक्ष भारतात, भारताचे पंतप्रधान सौदी अरेबियात; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य मोठे!!

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!