• Download App
    भैरवी सोशल फाऊंडेशनच्या 'जागर 2022' मध्ये विविध क्षेत्रातील गुणवंत्त महिलांचा सन्मान । Bhairavai social foundation organised 'jagar-2022' program

    भैरवी सोशल फाऊंडेशनच्या ‘जागर 2022’ मध्ये विविध क्षेत्रातील गुणवंत्त महिलांचा सन्मान

    भैरवी सोशल फाऊंडेशन व मोरया नर्सिंग होमच्या वतीने महिला दिनानिमित्त आयोजित ‘जागर 2022’मध्ये विविध क्षेत्रातील महिलांना सन्मानित करण्यात आले. Bhairavai social foundation organised ‘jagar-2022’ program


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : राजमाता जिजाऊ गर्जना, लाठी-काठी, दांडपट्टा, तलवारबाजी हे चित्तथरारक साहसी खेळ आणि मार्शल आर्ट प्रात्यक्षिकाने उपस्थितांच्या अंगावर शहारे उभे राहिले. निमित्त होते भैरवी सोशल फाऊंडेशन व मोरया नर्सिंग होमच्या वतीने महिला दिनानिमित्त आयोजित ‘जागर 2022’मध्ये विविध क्षेत्रातील महिलांना सन्मानित करण्यात आले.

    यावेळी वय वर्ष 4 ते 86 वयोगटातील राज्यातील निवडक 16 महिलांचा सन्मान ‘भैरवी महिला समाजरत्न पुरस्कार’ देवून करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर,  मोरया नर्सिंग होमच्या अध्यक्षा डॉ. सुचेता भालेराव, डॉ. सचिन भालेराव, आमदार नीलेश लंके यांच्या मातोश्री शकुंतला लंके,  शशिकला कुंभार, नेहा कदम, मनीषा कदम, डॉ. सुनील जगताप, डॉ. नीलेश जगताप, डॉ. सुनील इंगळे, राजू शेळके, डॉ. शाल्मली खुणे, भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या  एपीआय संगीता यादव, पल्लवी खोपडे, विकास काटे, डिंपल साबळे, विकास नाना फाटे,अश्विनीताई कदम,डॉ किशोर वरपे यांच्यासह ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाची टीम आदी उपस्थित होते. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी सचिन गवळी यांनी शिवागर्जना व राजमाता माँ साहेब जिजाऊ गर्जना सादर केली. फिरंगोजी शिंदे मर्दानी आखाडा कोल्हापूर यांनी दांडपट्टा, तलवारबाजी हे चित्तथरारक साहसी खेळ सादर केले. तर योद्धा मार्शल आर्टच्या वतीने स्वसरंक्षण प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.

    यावेळी बोलताना भैरवी सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुचेता भालेराव म्हणाल्या, महिलांनी आत्मनिर्भर, स्वावलंबी होणं ही काळाची गरज आहे. केवळ घरांपूरत आयुष्य मर्यादीत न ठेवता महिलांनी पुढाकार घेवून आपल्या आवडीनुसार नोकरी किंवा व्यावसाय करावा. अन् त्याच बरोबर आपल्या आरोग्याची ही काळजी घेतली पाहिजे. मानसिक आणि शारीरीक आरोग्य जपून महिला पुढे गेल्यास आपोआपच समाजाची प्रगती होईल.

    ‘जागर 2022’चा एक भाग म्हणून भैरवी सोशल फाऊंडेशन व मोरया नर्सिंग होमच्या वतीने महिला दिनानिमित्त खास महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जवळपास 500 महिलांच्या हिमोग्लोबिन, थायरॉईड, ब्लड शुगर आदी तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये ज्या महिलांचे हिमोग्लोबिन कमी आहे अशा महिलांना नर्सिंग होमच्या वतीने एक महिन्याचे औषध मोफत देण्यात आले.

    Bhairavai social foundation organised ‘jagar-2022’ program

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!