विशेष प्रतिनिधी
नाशिक : दिवाळीच्या शुभमुहूर्तावर लक्ष लक्ष दिव्यांनी तेजाची आराधना होत आहे. पण ज्या वाड्यात प्रत्यक्ष तेज जन्माला आले तो भगूरचा सावरकर वाडा देखील असाच दीपांनी उजळला आहे. Bhagur’s Savarkar mansion was illuminated by twinkling lights !!; Savarkar’s Swadeshalakshmi Pujan poem also goes viral !!
सावरकर वाडा स्मारकाचे व्यवस्थापक मनोज कुवर, सहव्यवस्थापक भूषण कापसे, खंडु रामगडे, विजय घोडेकर, आकाश नेहरे, सौरभ कुलकर्णी आदींनी परिश्रम करून सावरकर वाड्यामध्ये आकाश दिवे आणि पणत्यांची रोषणाई केली आहे.
आज लक्ष्मीपूजन आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दीपावलीचे लक्ष्मीपूजन नावाची कविता लिहिली आहे. या कवितेत सावरकरांनी विदेशी वस्तूंवर बहिष्कार घालण्याच्या उपदेश केला आहे. ही कविता सध्याच्या आत्मनिर्भर भारत योजनेच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
ही कविता सावरकरांनी रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत वर्ष १९२५ मध्ये रचली. ती आपल्या सर्वांना आजही मार्गदर्शन करणारी आहे. देश स्वतंत्र झाला तरी आपण स्वदेशी वस्तू खरेदी न करता परकीय वस्तू खरेदी करत आहोत. त्यामुळे आपण आपल्या घरी लक्ष्मीचे पूजन केले तरी ती आपल्यावर प्रसन्न न होता रागावणार आहे, असे सावरकर या कवितेतून आपल्याला सांगत आहेत. या कवितेतील काही अंश…
लक्ष्मी पूजन करू घरोघर,
आम्ही जरी भावे
प्रसन्न पूजेने ना होता,
लक्ष्मी रागावे
आणि विदेशी नळे फटाके,
फुलबाजा अंती
उडवूनी डिंडिमा पिटू,
आपल्या मुर्खांच्या जगती
अहो हिंदूंनो, कोटी कोटी रुपयांची,
या दिवशी
लक्ष्मी पूजावयासी लक्ष्मी,
धाडू विदेशासी
म्हणून आम्ही जरी पुजू घरोघरी,
ही लक्ष्मी भावे
प्रसन्न पूजने ना होता
लक्ष्मी रागावे
तरी हिंदूनो, घरात लक्ष्मी,
आधी आणावी
विदेशासी ना शिवू शक्य तो,
वृत्ती बाणवावी
देशी तेले, देशी साबू, देशी वस्त्राने
देशी साखर, देशी अस्त्रे, देशी शस्त्राने
स्वदेशलक्ष्मी पूजू साधुनी,
जरी मंगल वेळ
गजांतलक्ष्मी हिंदू हिंदूच्या,
दारी डोलेल!!
Bhagur’s Savarkar mansion was illuminated by twinkling lights !!; Savarkar’s Swadeshalakshmi Pujan poem also goes viral !!
महत्त्वाच्या बातम्या
- अखिलेश यादव यांना आयएसआयकडून संरक्षण आणि आर्थिक मदत, भाजपच्या मंत्र्यांचा संशय
- केंद्राने बंपर गिफ्ट, भाजपशासित राज्यांनीही पेट्रोल, डिझेलव किंमती कमी केल्या, आता महाराष्ट्रातील आघाडी सरकार करणार का?
- शंकरराव गडाख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी, शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्याने केली आत्महत्या
- मुलायमसिंह यादव यांच्या परिवारात आता होणार एकी; काका शिवपालांशी अखिलेश यादव करणार युती
- कॉँग्रेसमध्ये मद्यपान केलेले चालणार, नव्या संविधानात दिली जाणार सवलत