• Download App
    पवारांनी अभिजीत पाटलांना "निवडल्यानंतर" भगीरथ भालकेंनी निवडला बीआरएसचा पर्याय; पवारांनी अँटीसिपेट केलेय नुकसान!!|Bhagirath Bhalke opted for BRS

    पवारांनी अभिजीत पाटलांना “निवडल्यानंतर” भगीरथ भालकेंनी निवडला बीआरएसचा पर्याय; पवारांनी अँटीसिपेट केलेय नुकसान!!

    प्रतिनिधी

    पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला दणका बसणार असल्याच्या बातम्या मराठी प्रसार माध्यमांनी दिल्या असल्या तरी प्रत्यक्षात शरद पवारांनी आपला चॉईस अभिजीत पाटलांच्या रूपाने निवडल्यानंतरच भगीरथ भालके यांनी स्वतःच्या राजकीय भवितव्यासाठी बीआरएसचा पर्याय निवडल्याचे स्पष्ट होत आहे.Bhagirath Bhalke opted for BRS

    भगीरथ भालके हे इथे 27 जून रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस मध्ये प्रवेश करणार आहेत. त्याच्या बातम्या देताना मराठी माध्यमांनी राष्ट्रवादीला खिंडार पडणार असल्याची रंगतदार वर्णने केली आहेत.



    पण प्रत्यक्षात यातली वस्तुस्थिती मात्र थोडी वेगळी आहे. आमदार भारत भालके यांचे निधन झाल्यानंतर पोट निवडणुकीत पंढरपूर मधून राष्ट्रवादी काँग्रेसने भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्ष एकत्र होते, पण तरी देखील भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी भगीरथ फालके यांचा पराभव केला. त्यानंतर पंढरपूरच्या चंद्रभागेतून बरेच राजकीय पाणी वाहून गेले आणि बडे साखर कारखानदार अभिजीत पाटलांच्या रूपाने शरद पवारांनी आपला वेगळा चॉईस केला. त्यांच्या शेतकरी मेळाव्यात उपस्थित राहून त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला. इतकेच नाहीतर पंढरपूरचे पुढचे उमेदवार अभिजीत पाटील असतील, असे पवारांनी सूचित केले.

    अशा स्थितीत भगीरथ भालके यांच्यापुढे राष्ट्रवादीतला राजकीय भवितव्याचा प्रश्न तयार झाला. त्यांनी या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी दोन आठवड्यांपूर्वी हैदराबादला जाऊन चंद्रशेखर राव यांची भेट घेतली होती. त्याचवेळी त्यांनी आपण पंढरपूरच्या जनतेचा कौल घेऊन योग्य त्या पक्षात प्रवेश करू, असे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांनी दोन मेळावे घेतले आणि त्या मेळाव्यांमधून त्यांना मिळालेल्या कौलानुसार त्यांनी बीआरएसचा पर्याय निवडला.

    दरम्यानच्या काळात अजित पवारांनी बीआरएस आणि एमआयएम या पक्षांना हलक्यात घेऊ नका, असा इशारा पंढरपूर मधल्या कार्यकर्त्यांना दिला होता. पण हा इशारा देखील भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीत रोखू शकला नाही.

    एकीकडे भगीरथ भालके बीआरएस मध्ये 27 जूनला प्रवेश करणार असतात दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भगीरथ भालके यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. भगीरथ भालके यांनी वेगळा विचार करू नये. त्यांना काँग्रेसच उत्तम मार्ग दाखवू शकेल. अडचणीच्या काळात त्यांनी माझी जरूर आठवण काढावी. कारण भारत भालकेंचे आपले चांगले संबंध होते, असे वक्तव्य नाना पटोले यांनी सोलापूर जिल्ह्यातल्या मेळाव्यात केले.

    पण सध्या तरी यांचा निर्णय झाला आहे आणि येत्या 27 जून रोजी चंद्रशेखर राव तेलंगणचे अख्खे मंत्रिमंडळ घेऊन पंढरपूर मध्ये विठ्ठलाच्या दर्शनाला येणार आहेत आणि त्यावेळी होणाऱ्या शेतकरी मेळाव्यात भगीरथ भालके बीआरएस मध्ये प्रवेश करणार आहेत. यातून राष्ट्रवादीचे नुकसान होणार असले तरी शरद पवारांनी ते आधीच अँटीसिपेट केले असल्याचेच त्यांच्या अभिजीत पाटलांच्या चॉईस मधून दिसून येते!!

    Bhagirath Bhalke opted for BRS

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!