• Download App
    विश्वासघात आणि माघार ही आमच्या घराण्याची परंपरा नाही; उदयनराजेंचा पवारांना टोला Betrayal and withdrawal are not our family tradition

    विश्वासघात आणि माघार ही आमच्या घराण्याची परंपरा नाही; उदयनराजेंचा पवारांना टोला

    प्रतिनिधी

    सातारा : सातारा जिल्ह्याच्या लोकसभा खासदारकीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विद्यमान राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्यात राजकीय जुगलबंदी जुंपली आहे. भाजपने उदयनराजेंना कोणतीही जबाबदारी दिली तरी राष्ट्रवादीला फरक पडणार नाही. श्रीनिवास पाटलांच्या उमेदवारीमुळे सातारा लोकसभेत कोणाला फरक पडला होता?, हे तुम्हाला माहिती आहे, अशी टोलेबाजी शरद पवारांनी नुकतीच केली होती. त्यावर उदयनराजेंनी विश्वासघात आणि माघार हे आमच्या घराण्याची परंपरा नाही असे प्रत्युत्तर देत पवारांना प्रतिटोला दिला आहे. Betrayal and withdrawal are not our family tradition

    रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांनी शरद पवारांना उदयनराजे संदर्भात प्रश्न विचारला होता. उदयनराजे यांना भाजप मोठी जबाबदारी सोपवणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला सातारा जिल्ह्यात काय फरक पडेल?, असे विचारल्यावर पवार म्हणाले होते, की राष्ट्रवादीला त्यांच्या जबाबदारीतून काही फरक पडणार नाही. उलट श्रीनिवास पाटलांची लोकसभेला उमेदवारी होती, तेव्हा साताऱ्यात काय फरक पडला हे तुम्हाला माहिती आहे.



    यासंदर्भात उदयनराजेंना आज पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी शरद पवारांचा निवृत्ती नाट्याचा विषय काढला. शरद पवारांनी निवृत्ती घोषित करून नंतर राजीनामा मागे घेतला. या संदर्भात टोला हाणताना उदयनराजे म्हणाले, ते मोठे नेते आहेत. त्यांचे वाचन मोठे आहे. पण साताऱ्या बाबतचे ते बोलले ते खरे आहे. मी राजीनामा दिला. पण माघार घेतली नाही आणि विश्वासघात करणे ही आमच्या घराण्याची परंपरा नाही. उदयनराजेंनी हाणलेल्या या टोल्यावर राष्ट्रवादीची अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.

    Betrayal and withdrawal are not our family tradition

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस