• Download App
    बीड : पाचपैकी तीन नगरपंचायतींवर भाजपचा झेंडा, दोन ठिकाणी राष्ट्रवादीची सरशी । Beed BJP's flag in three out of five Nagar Panchayats, NCP's flag in two places

    बीड : पाचपैकी तीन नगरपंचायतींवर भाजपचा झेंडा, दोन ठिकाणी राष्ट्रवादीची सरशी

    बीड जिल्ह्यातील पाच नगर पंचायतींचा निकाल हाती लागला आहे. या निवडणुकीत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचं वर्चस्व दिसून आलंय. तर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मात्र धक्का बसलाय. आष्टी, पाटोदा, शिरूर या नगरपंचायतींवर भाजपने वर्चस्व मिळवले आहे. तर वडवणीमध्ये सत्ताधारी भाजपला बाजूला सारवत राष्ट्रवादीने विजय मिळवलाय. केजमध्ये राज्यसभा खासदार रजनी पाटील यांना पराभव पत्करावा लागलाय. त्याठिकाणी राष्ट्रवादी, शेकाप आणि स्थानिक आघाडीने सत्ता काबीज केली आहे. Beed BJP’s flag in three out of five Nagar Panchayats, NCP’s flag in two places


    विशेष प्रतिनिधी

    बीड : बीड जिल्ह्यातील पाच नगर पंचायतींचा निकाल हाती लागला आहे. या निवडणुकीत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचं वर्चस्व दिसून आलंय. तर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मात्र धक्का बसलाय. आष्टी, पाटोदा, शिरूर या नगरपंचायतींवर भाजपने वर्चस्व मिळवले आहे. तर वडवणीमध्ये सत्ताधारी भाजपला बाजूला सारवत राष्ट्रवादीने विजय मिळवलाय. केजमध्ये राज्यसभा खासदार रजनी पाटील यांना पराभव पत्करावा लागलाय. त्याठिकाणी राष्ट्रवादी, शेकाप आणि स्थानिक आघाडीने सत्ता काबीज केली आहे.

    मात्र, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या कन्येला पराभव स्वीकारावा लागला आहे. जिल्ह्यात मुंडे बहीण भावात रंगलेल्या सत्तासंघर्षात बहिण पंकजा मुंडे यांनी या निवडणुकी निमित्त आपलं वर्चस्व दाखवून दिलं आहे.



    पाचपैकी तीन न.पं.वर भाजपची सत्ता

    जिल्ह्यात झालेल्या पाच नगरपंचायतींच्या निवडणुकीत आष्टी, पाटोदा आणि शिरूर या तीन नगरपंचायतींवर भाजप आमदार सुरेश धस यांनी आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. आष्टीमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांच्या झालेल्या सभेदरम्यान संघर्ष दिसून आला होता.

    दरम्यान, ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची झाली होती. राष्ट्रवादीने जोर लावल्यानं आमदार सुरेश धस आपला गड राखतील का? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, आज हाती आलेल्या निकालावरून त्यांनी आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. आष्टीत मोठ्या जल्लोषात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आमदार सुरेश धस यांना या विजयाचं श्रेय दिल आहे. तर येणाऱ्या पुढील निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात भाजप सत्तेतही असेल, असंदेखील धस यावेळी म्हणाले आहेत.

    केजमध्ये सत्ताधारी काँग्रेसचा पराभव; खा. रजनी पाटील यांनी दिली प्रतिक्रिया

    बीडच्या केज नगर पंचायतीमध्ये सत्ताधारी काँग्रेसला मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. मागील दहा वर्षे या नगरपंचायतीवर काँग्रेसची एक हाती सत्ता होती. खासदार रजनी पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. स्थानिक आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेसने या नगरपंचायती वर विजय मिळवला आहे. राज्यात महाविकास आघाडी असली तरी केज नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस दोघेही वेगळे निवडणूक लढले होते. त्यामुळे आता सत्ताधारी काँग्रेसला बाजूला सारत राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी विजय मिळवलाय. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या कन्येला पराभव स्वीकारावा लागलाय. नगरपंचायतीचा पराभव राज्यसभा खासदार रजनी पाटील यांनी स्वीकारला आहे. यापुढेदेखील जनतेची सेवा करू, असं यावेळी खासदार पाटील म्हणाल्या आहेत.

    Beed BJP’s flag in three out of five Nagar Panchayats, NCP’s flag in two places

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!