वृत्तसंस्था
मुंबई : भारतीय संघाने टी २० वर्ल्ड कपची सुरुवातच खराब केली आहे. पहिल्याच सामन्यात पाकिस्तान संघाकडून १० विकेट्सने पराभूत झाल्यानंतर सर्व संघावर टीका केली जात होती. पण यावेली रागाच्या भरात काही नेटकऱ्यांनी अतिशय चूकीच्या पद्धतीने मोहम्मद शमीला पराभवाचा जबाबदार ठरवत त्याच्या धर्मावरुन टीका केली. शमी ट्रोल होताच अनेक आजी माजी क्रिकेटपटू त्याच्या समर्थनार्थ समोर आले. त्यानंतर आता बीसीसीआयने शमीला पाठिंबा दर्शवत एक ट्विट केलं आहे. BCCI Supported mohammed shami by tweeting when he gets trolled on social media after india vs pakistan match
पाकिस्तानविरुद्ध मोहम्मद शमीने ३५ षटकात ४३ धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर पाकिस्तानच्या सलामीवीरांनी ६ चौकार, एक षटकार ठोकला. या खराब कामगिरीनंतर लोकांनी मोहम्मद शमीला सोशल मीडियावर ट्रोल केले आणि त्याच्यावर उलट-सुलट आरोप केले आहेत. मोहम्मद शमीच्या विरोधात ट्विटरवर अनेक गोष्टी लिहिल्या जात होत्या. त्यानंतर सर्वात आधी सेहवागने ट्विट करत शमीला पाठिंबा दर्शवला, ज्यानंतर अनेकांनी ट्विट केलं. आकाश चोप्राने तर थेट त्याचा ट्विटरचा फोटो बदलून शमीचा फोटो ठेवला.
बीसीसीआयचं ट्विट
या सर्वानंतर बीसीसीआयनेही ट्विट करत शमीला पाठिंबा दर्शवला. या ट्विटमध्ये बीसीसीआयने सामन्यातील शमीचा विराट सोबतचा एक फोटो ट्विट करत लिहिलं आहे की, ‘गर्व (या शब्दासमोर तिरंग्याचा इमोजी लावला आहे), मजबूत, पुढे आणि सर्वोच्च. असे पाच शब्द लिहित आम्हाला शमीवर गर्व असून तो मजबूतीने पुढे जाईल असं बीसीसीआय म्हणून इच्छित असल्याचं अनुमान लावलं जात आहे.
BCCI Supported mohammed shami by tweeting when he gets trolled on social media after india vs pakistan match
महत्त्वाच्या बातम्या
- दिवाळीच्या तोंडावर २० रेल्वे गाड्या रद्द; अमरावतीत बडनेरा रेल्वे डेपोच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने निर्णय
- पेट्रोल-डिझेल कंपन्यांना दर ठरविण्याचा अधिकार काँग्रेस राजवटीत दिला; वारंवार इंधनाची दरवाढ
- भारतीय वंशाच्या अनिता आनंद बनल्या कॅनडाच्या नवीन संरक्षण मंत्री , पंतप्रधान ट्रुडो यांनी केली नवीन मंत्रिमंडळाची घोषणा
- AGAIN INDIA VS PAK : भारत-पाक सामन्यातील विक्रमांचा पाकला विसर ! हरभजनची धडाकेबाज ‘बोलिंग’ आणि मोहम्मद आमिर गपगार ! फिक्सर को सिक्सर-दोघांमध्ये तुफान ट्विटर वॉर….