BCCI Announces Hike in Match Fee : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाचे सचिव जय शाह यांनी सोमवारी ट्विट केले की, बोर्डाने देशांतर्गत खेळाडूंच्या मॅच फीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. जय शाह यांच्यानुसार, 40 पेक्षा जास्त सामने खेळणाऱ्या खेळाडूंना आता 60,000 रुपये मिळतील. त्याचबरोबर, 23 वर्षांखालील खेळाडूंना 25,000 रुपये आणि 19 वर्षांपेक्षा कमी वयाच्या क्रिकेटपटूंना बोर्डाकडून 20,000 रुपये मानधन दिले जाईल. BCCI Announces Hike in Match Fee for Domestic Cricketers Read in Details
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाचे सचिव जय शाह यांनी सोमवारी ट्विट केले की, बोर्डाने देशांतर्गत खेळाडूंच्या मॅच फीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. जय शाह यांच्यानुसार, 40 पेक्षा जास्त सामने खेळणाऱ्या खेळाडूंना आता 60,000 रुपये मिळतील. त्याचबरोबर, 23 वर्षांखालील खेळाडूंना 25,000 रुपये आणि 19 वर्षांपेक्षा कमी वयाच्या क्रिकेटपटूंना बोर्डाकडून 20,000 रुपये मानधन दिले जाईल.
2019-20 या देशांतर्गत हंगामात सहभागी होणाऱ्या क्रिकेटपटूंना 2020-21 हंगामाची भरपाई म्हणून अतिरिक्त 50 टक्के सामना शुल्क दिले जाईल, कारण कोरोना महामारीमुळे हंगाम पुढे ढकलण्यात आला आहे.
जय शहा यांनी ट्विट करून माहिती दिली
बोर्डाचे सचिव जय शाह यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “देशांतर्गत क्रिकेटपटूंसाठी मॅच फी वाढीची घोषणा करताना मला आनंद होत आहे. सीनियर- INR 60,000 (40 सामन्यांपेक्षा जास्त), अंडर 23- INR 25,000, अंडर 19- INR 20,000.”
भारताचा देशांतर्गत क्रिकेट सीझन 21 सप्टेंबर 2021 रोजी वरिष्ठ महिला एकदिवसीय लीगसह सुरू होईल आणि त्यानंतर वरिष्ठ महिला एकदिवसीय चॅलेंजर ट्रॉफी होईल, जी 27 ऑक्टोबर 2021 पासून होणार आहे.
रणजी करंडक
सय्यद मुश्ताक अली करंडक 20 ऑक्टोबर 2021 रोजी सुरू होईल, अंतिम सामना 12 नोव्हेंबर 2021 रोजी खेळला जाईल. कोरोना महामारीमुळे गेल्या हंगामात रद्द झालेली प्रतिष्ठित रणजी ट्रॉफी तीन महिन्यांत खेळली जाईल. यासाठी 16 नोव्हेंबर 2021 ते 19 फेब्रुवारी 2022 पर्यंत एक विंडो ठेवण्यात आली आहे. विजय हजारे करंडक 23 फेब्रुवारी 2022 ते 26 मार्च 2022 दरम्यान खेळला जाईल. या हंगामात पुरुष आणि महिलांच्या गटात एकूण 2127 सामने वेगवेगळ्या वयोगटांमध्ये खेळले जातील.
BCCI Announces Hike in Match Fee for Domestic Cricketers Read in Details
महत्त्वाच्या बातम्या
- Pornographic Case : पॉर्नोग्राफी केसमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला जामीन, 19 जुलैपासून होता
- मीटूचा आरोप असलेले चरणजीत मुख्यमंत्रिपदासाठी लायक नाहीत, काँग्रेसने त्यांना हटवावे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांची मागणी
- Corona Vaccine : गर्भवती महिला आणि नवजात बालकांवर लसीचा काय परिणाम होतो? सुप्रीम कोर्टाने केंद्राला मागितले उत्तर
- इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांनी तालिबानवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली, सीरियल बॉम्बस्फोटांचा केला दावा
- रशियाच्या पर्म स्टेट युनिव्हर्सिटीत माथेफिरूचा अंदाधुंद गोळीबार, 8 विद्यार्थी ठार, अनेक जण जखमी